तरुण डॉक्टर मुलाच्या मृत्यूने ऊसतोड कुटुंबीय उद्ध्वस्त

बिपीन देशपांडे, लोकसत्ता

Nashik, Girl died falling into bucket,
नाशिक : पाण्याच्या बादलीत पडून बालिकेचा मृत्यू
Death of two brothers
पाण्याच्या टाकीत पडून दोन भावांचा मृत्यू: दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना लगेचच झोपडीवरही कारवाई, न्यायालयाने घेतली दखल
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू
mukhtar ansari umar ansari
“कट रचून विषप्रयोग केला”, मुख्तार अन्सारीच्या मुलाचे गंभीर आरोप; म्हणाला “तीन दिवसांपूर्वी त्यांनी…”

औरंगाबाद : एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण झालेच आहे, आता पदव्युत्तरची पदवी घेऊन आपल्या शिक्षणासाठी आई-वडिलांसह लहान भावाने खस्ता खात हाती घेतलेला कोयता कायमचा सोडवायचा आहे. कुडा-पत्र्याचे घरही बांधायचे. नंतर लग्नासाठी येणारी स्थळेही पाहायची, अशी कितीतरी आशा-आकांक्षेने भरलेली स्वप्ने एका २५ वर्षांच्या तरुण डॉक्टरच्या मृत्यूने बेचिराख झाली आणि ऊसतोड करणारे कुटुंब उघडय़ावर आले. डॉ. राहुल पवार यांनी बुधवारी करोनाशी लढताना एमजीएम रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

नुकतेच एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केलेले डॉ. पवार यांची ढासळती प्रकृती पाहून त्यांचा लहान भाऊसचिन पवार यांच्यापासून ते अन्य डॉक्टर मित्रांनी सर्वोत्तम उपचार मिळावेत, यासाठी मदतीची चळवळ उभी केली होती. पण त्यांच्या प्रयत्नांची शिकस्तही डॉ. राहुल यांना वाचवू शकली नाही.

मूळचे परभणीच्या पाथरी तालुक्यातील आनंदनगर तांडा येथील रहिवासी असलेले डॉ. राहुल पवार यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण आश्रमशाळेत, तर अकरावी-बारावीपर्यंतचे शिक्षण लातूरमध्ये घेतले. इतर नातेवाइकांच्या मदतीने शिकवणीवर्ग लावले. बारावीला उत्तम गुण मिळाल्यानंतर लातूरमधील खासगी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएससाठी (बॅचलर ऑफ मेडिसिन अ‍ॅण्ड बॅचलर ऑफ सर्जरी) प्रवेश मिळाला. एकही वर्ष वाया जाऊ न देता वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. आई-वडील-भाऊ हे ऊसतोडीला जाऊन आपल्या शिक्षणाचा भार उचलत असलेल्या डॉ. राहुल पवार यांनी स्वत: स्वयंपाक तयार करून आणि गतवर्षीच्या करोनाच्या पहिल्या लाटेत इतर डॉक्टरांकडे सेवा देऊन शैक्षणिक खर्च उचलला. डॉ. पवार यांना कायमच आई-वडील, भावाच्या कष्टाची जाणीव असल्यानेच ते अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे. करोनाच्या परिस्थितीमुळे प्रात्यक्षिक परीक्षा चुकवली तर पुन्हा कधी होईल याचा कालावधी स्पष्ट होत नसल्याने गेल्या महिन्यात करोनाची सौम्य लक्षणे असतानाही डॉ. पवार यांनी आराम-आहाराऐवजी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आणि करोनाचा विषाणू फुप्फुसाला पोखरत गेला. यातच त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करूनही प्रकृतीत सुधार झाला नाही आणि बुधवारी दुपारी अखेरचा श्वास घेतला, असे डॉ. राहुल यांचे मावसबंधू आणि एमजीएम रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत चव्हाण यांनी सांगितले.

कुटुंब उघडय़ावर; मदतीची मागणी

डॉ. राहुल पवार यांच्यासारख्या तरुण डॉक्टरचा मृत्यू हा समाजासाठी धक्का आहे. दिल्ली सरकारकडून तरुण डॉक्टरांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना एक कोटींची मदत देण्यात येते. त्याच धर्तीवर आणि डॉ. राहुल यांची ऊसतोड कुटुंबाची पार्श्वभूमी पाहता त्यांच्या कुटुंबीयांनाही मदतीचा हात द्यावा, अशी मागणी त्यांच्या डॉक्टर मित्रांकडून पुढे येत आहे.

आंतरवासिता डॉक्टर विमा संरक्षणापासून वंचित

वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून आंतरवासिता सेवा बजावणारे विद्यार्थी इतर उपचारांसोबतच करोनाच्या कक्षातही काम करत आहेत. करोनाचा संसर्ग होण्याचा धोका पाहता निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांप्रमाणेच आंतरवासिता डॉक्टरांना विमा संरक्षण द्यावे, अशी मागणीही आता वैद्यकीयच्या विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. २०१६ च्या तुकडीतून शासकीय महाविद्यालयातून २७६०, तर खासगीमधून १९७० वैद्यकीयचे शिक्षण पूर्ण करून बाहेर पडलेले विद्यार्थी आहेत.