20 October 2020

News Flash

भविष्यनिर्वाह निधीचे २७ लाख हडपले, उद्योजकाला बेड्या

भविष्य निर्वाहनिधी कार्यालयाने याबाबत ३ वेळेस नोटीस देऊन ही बनगीरवार यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते.

(संग्रहित छायाचित्र)

औरंगाबादमधील रेल्वे स्टेशन औद्योगिक परिसरातील त्रिमूर्ती फूडस या कंपनीच्या मालकाने २०१४ ते २०१७ या काळातले कामगारांचे भविष्य निर्वाह निधीचे २६ लाख ९४ हजार ३२२ रुपये न भरता त्या रकमेचा अपहार केला. याप्रकरणी वेदांतनगर पोलिसांनी उद्योजकाला बेड्या ठोकल्या आहेत. कोर्टाने तीन दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली आहे.

अतुल दत्तात्रेय बनगीरवार असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. चॉकलेटस आणि इतर खाद्य पदार्थ बनवणारी त्याची एक कंपनी आहे. भविष्य निर्वाहनिधी कार्यालयाने याबाबत ३ वेळेस नोटीस देऊन ही बनगीरवार यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. म्हणून भविष्यनिधी कार्यालयातर्फे अंमलबजावणी अधिकारी आर. एस. शेख यांच्या तक्रारीवरुन बनगीरवार विरोधात गुन्हा दाखल करत कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल आडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रविण पाटील करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2019 10:31 am

Web Title: 27 lakh to winnow of the provident fund the entrepreneurs are arrested
Next Stories
1 बदल्यांची यादी १० फेब्रूवारीच्या आधी पाठवा, पोलीस महासंचालकांचा आदेश
2 औरंगाबाद : चार वर्षांच्या चिमुकलीचा पराक्रम, दोन तासात सर केला हरिश्चंद्रगड
3 दाभोलकर हत्येशी सुरळेंचा संबंध नसल्याचा ‘सीबीआय’चा खुलासा
Just Now!
X