02 March 2021

News Flash

बीड जिल्ह्यतील १२ मदरशांना ५० लाखांचा निधी

या संदर्भात राज्य शासनाने जिल्ह्यातील १२ मदरशांना ५० लाख १५ हजार रुपयांचा निधी मंजूर केला.

प्रातिनिधिक छायाचित्र

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत जिल्ह्यातील १२ मदरशांना ५० लाख १५ हजार रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला. बीडच्या एका मदरशात मुलेच आढळून न आल्याने त्यास अनुदानातून वगळण्यात आले.

बीड जिल्ह्यातील मदरशांकडून डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण अनुदान योजनेंतर्गत प्रस्ताव मागवण्यात आले होते. सादर झालेल्या प्रस्तावांची जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने छाननी केल्यानंतर ते प्रस्ताव मंजुरीसह आवश्यक निधीच्या मागणीने शासनाकडे पाठवण्यात आले होते.

या संदर्भात राज्य शासनाने जिल्ह्यातील १२ मदरशांना ५० लाख १५ हजार रुपयांचा निधी मंजूर केला. त्यामध्ये बीड येथील नूर तालिमी, मोहमंदिया लिन बनात, फातेमातुल जोहरा, राजिउल उलूम, उमलून मोमीनीन, दारूल फलाह लिन बनात, तजविदुल दाउतपुरा, इस्लाहुल बनात, सलामत, अरबिया दारूल उलूम आणि दारूल उलूम मोहमंदिया माजलगाव व अंजुमन उल उलूम (कामखेडा, ता. बीड) या मदरशांचा समावेश आहे. हे अनुदान पायाभूत सुविधा, ग्रंथालय व शिक्षक मानधन आदींसाठी वापरण्यात येणार असून, तीन महिन्यांच्या आत प्रस्तावातील नमूद कामे करणे बंधनकारक आहे.

तर बीड येथील उस्मानिया मदरसा येथे पाहणीत मुलेच आढळून न आल्याने त्यास अनुदानातून वगळण्यात आले आहे. अनुदान वितरित करण्यापूर्वी संबंधित मदरसा सद्य:स्थितीत चालू आहेत का, याची खातरजमा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात यावी असे शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2016 1:45 am

Web Title: 50 lakh fund for madrasa school in beed
Next Stories
1 ‘भारतीय समाजात आजही स्त्रीला पोटभाडेकरूची वागणूक’
2 ‘नॅनो तंत्रज्ञानाच्या आधारे खतांची कार्यक्षमता वाढवता येणे शक्य’
3 औरंगाबादच्या मंत्रिमंडळ बैठकीतून मोठय़ा अपेक्षा
Just Now!
X