24 September 2020

News Flash

Coronavirus : औरंगाबादमध्ये करोना मृत्यूचे थमान

बळींचा आकडा ५०० वर

संग्रहित छायाचित्र

बळींचा आकडा ५०० वर

औरंगाबाद :  जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या वाढत असून उपचारादरम्यान बुधवारी सात जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत औरंगाबादमधील मृत्यूची संख्या ५०० झाली आहे. चाचण्यांचा वेग वाढवून रुग्णसंख्या शोधण्यात यश येत असल्याने मृत्युदर नियंत्रणात आणण्यात औरंगाबाद जिल्हा प्रशासन आणि महापालिकेला यश येत असले, तरी गंभीर रुग्णांची स्थिती १२६ एवढी आहे. आतापर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात ३८१ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, शहरातील करोना रुग्णांची संख्या १८५ ने वाढली आहे. दरम्यान, ग्रामीण भागातील रुग्णांचे मृत्यू वाढू लागले आहे.

सिल्लोड तालुक्यातील आंबाई येथील ७३ वर्षांच्या पुरुषाचा बुधवारी दुपारी मृत्यू झाला. तसेच औरंगाबाद तालुक्यातील साजापूर येथील व्यक्तीचा मृत्यू झाला. उपजिल्हा रुग्णालयातून या रुग्णास उपचारासाठी पाठविण्यात आले होते. या दोन्ही रुग्णांना मधुमेह व उच्च रक्तदाब होता. फुलंब्री तालुक्यातील वडोदबाजार, सिल्लोड शहरातील जामा मशीद भागातील एका महिलेचा मृत्यू झाला. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील पुरुष, छावणी परिसरातील व्यक्ती तसेच एन-६ मधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. लवकर निदान झाले तर या आजारात मृत्यू टाळता येतो.

शहरात याची जागृती होत असली, तरी ग्रामीण भागात तशी ती नाही. जिथे जागृती आहे तेथून पोहचण्यास होणारा उशीर हे देखील एक कारण असू शकते, असे सांगण्यात येते. शहरातील विविध भागात अँटिजेन चाचण्या सुरू असताना राजकीय आंदोलनेही वाढली आहेत. कोणत्याही कारणाने एकत्र येणाऱ्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांमुळेही अडचणी वाढू शकतात, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, जिल्ह्याच्या करोना रुग्णसंख्येत सकाळी ५८ रुग्णांची वाढ झाली होती. त्यामुळे रुग्णसंख्या १५ हजार २०८ वर पोहोचली असून ११ हजार ३६८ रुग्ण बरे झाले आहेत.

जालन्यात ६४ टक्के रुग्ण करोनामुक्त

जिल्ह्य़ातील एकूण करोनाबाधितांची संख्या बुधवारी सकाळपर्यंत २ हजार ४९५ झाली. यापैकी १ हजार ५९७ रुग्ण (६४ टक्के) करोनामुक्त झाले. जिल्ह्य़ात आतापर्यंत अकरा हजारांपेक्षा अधिक नमुन्यांचा अहवाल नकारात्मक आलेला आहे. करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ७५ झाली आहे. सध्या जिल्ह्य़ात संस्थात्मक अलगीकरणात ४६६ व्यक्ती आहेत. सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टय़ा न वापरणे आणि शारीरिक अंतर ठेवण्याच्या नियमांचे पालन केले नाही, अशा जवळपास तीन हजार व्यक्तींकडून साडेसहा लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 2:40 am

Web Title: 500 people so far died due to covid 19 in aurangabad zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 उद्योगाचे चाक फिरते, पण गती मंदावलेलीच
2 सणासुदीत खाद्यतेलाची दरवाढ!
3 लोकसंख्येच्या प्रमाणात चाचण्यांमध्ये औरंगाबाद राज्यात अव्वल
Just Now!
X