उद्योग आणि शिक्षण यांची सांगड घालता यावी म्हणून राज्यातील उद्योग विभागाने गेल्या काही दिवसात ५० हजार कोटी रुपयांचे करार केले आहेत. पहिल्या टप्प्यात १५ हजार कोटी आणि अलिकडेच ३५ हजार कोटी रुपयांचे करार केले. ज्यांच्याबरोबर करार केले त्यांना सुविधा देण्याचेही काम सुरू आहे.

पदवीधर आणि शिक्षण याची जोड घालून काम केले जात आहे. कोविडचे संकट नसते तर ‘महाविकास’ हा आघाडीसाठी वापरला जाणारा शब्दही आणखी पुढे नेता आता असता असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री ठाकरे यांची दूरचित्रसंवाद माध्यमातून सभेचे आयोजन करण्यात आले होते.

‘उद्योग आणि पदवी याची सांगड घालता यावी म्हणून विशेष प्रयत्न केले जात आहेत. पदवी घेतली आणि नोकरीच नाही मिळाली तर सगळे मुसळ केरात जाईल. हे लक्षात घेऊन संवेदनशीलतेने काम करत आहोत. उद्योग विभागाने करोनाचे संकट असतानाही केलेले काम मोठे असल्याचे त्यांनी सांगितले