News Flash

दिंडय़ांसोबत पाण्याच्या टँकरचीही ‘वारी’

लहान दिंडय़ांना पाच हजार लिटरचा तर मोठय़ा दिंडय़ांना दहा हजार लिटर पाण्याचा टँकर पुरवला जात आहे.

लांबलेला पाऊस अन आटलेल्या जलसाठय़ांचा परिणाम

बिपीन देशपांडे, औरंगाबाद

हाती टाळ, मुखी ‘ज्ञानोबा-तुकाराम’ नामाचा गजर करत निघालेल्या वारकऱ्यांच्या मागे-मागे पाण्याचा टँकर, असे पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या दिंडय़ांमधील चित्र आहे. मराठवाडय़ातील भीषण दुष्काळाची धग दर्शवणारे हे चित्र जून महिना संपत आलेला असतानाही कायम आहे. औरंगाबाद जिल्ह्य़ातून निघालेल्या ५३ दिंडय़ांची भिस्त ५५ पाण्याच्या टँकरवर अवलंबून आहे. द्वादशीपर्यंत म्हणजे पंढरपूरला पोहोचेपर्यंत टँकरद्वारे पाणीपुरवठा होणार आहे. जूनच्या शेवटच्या आठवडय़ात मराठवाडय़ातून पंढरपूर, आळंदीकडे शेकडो दिंडय़ा मार्गस्थ झालेल्या आहेत. मराठवाडय़ातील दुष्काळी परिस्थिती आणि वाटेतही पाणी कोठे उपलब्ध होणार नाही, अशी परिस्थिती आहे. ती ओळखून दिंडी प्रमुखांकडून यंदा टँकरची मागणी करण्यात आली होती. दिंडय़ांना पाणी टँकरचा पुरवठा करण्यास तत्काळ मंजुरी मिळणार नाही, याचा अंदाज बांधून दिंडी प्रमुखांनी स्थानिक आमदारांसह इतर लोकप्रतिनिधींचे पत्र जोडून टँकरची व्यवस्था करून घेतली. लहान दिंडय़ांना पाच हजार लिटरचा तर मोठय़ा दिंडय़ांना दहा हजार लिटर पाण्याचा टँकर पुरवला जात आहे. पाण्याचे हे टँकर पंढरपूपर्यंत दिंडय़ांच्या सोबत जाणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील गौंडगाव कोंडूर येथील दिंडीचालक आत्माराम कराळे म्हणाले,की दिंडीसाठी पाण्याची व्यवस्था व्हावी, अशी मागणी पुणे महानगरपालिकेकडे करण्यात आली होती. त्यानुसार पुणे मनपा पंढरपूपर्यंत पाण्याचा टँकर सोबत देत आहे.

ज्ञानेश्वर महाराजांचे मूळ गाव असलेल्या पैठण तालुक्यातील आपेगाव येथील भानुदास महाराज कोल्हापूरकर यांनी सांगितले,की दिंडीत तीन हजार वारकरी आहेत. बीड जिल्ह्य़ातील पाटोदा मार्गे जाताना पुढे वारकऱ्यांची संख्या वाढते. दररोज तीन ते चार हजार वारकऱ्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी औरंगाबाद जिल्हा परिषदेकडे टँकरची मागणी केली होती. त्यानुसार दररोज एका मोठय़ा टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. द्वादशीपर्यंत म्हणजे दिंडी पंढरपुरात पोहोचेपर्यंत पाण्याचा टँकर वारकऱ्यांसोबतच राहील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2019 12:59 am

Web Title: 53 di%e1%b9%87%e1%b8%8di group leaving with 55 water tankers from aurangabad zws 70
Next Stories
1 मराठा आरक्षण न देता नोकरभरती; खंडपीठात याचिका
2 ‘गंगाखेड शुगर’च्या रत्नाकर गुट्टेंचा ‘प्रताप’
3 दुग्ध व्यवसायातील नफाही आटला
Just Now!
X