News Flash

औरंगाबाद मनपाच्या श्वान पथकांनी ५५० मोकाट कुत्रे पकडले

प्रशासनाने मोकाट कुत्रे पकडण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला.

(संग्रहित छायाचित्र)

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्तसाठी मनपाच्या वतीने ११ ते ३१ डिसेंबर दरम्यान झोन निहाय विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या विशेष मोहिमेअंतर्गत मनपाच्या श्वान पथकांनी आता पर्यत साडे पाचशे मोकाट कुत्रे पकडले असल्याची माहिती पशुधन पर्यवेक्षक शेख शाहिद यांनी दिला आहे.

औरंगाबाद शहरात मोकाट कुत्र्यांच्या झुंडी रस्त्यावर फिरताना दिसतात. अनेक वेळा तर या मोकाट कुत्र्यांनी अनेकांना चावा घेतल्याचा प्रकारही घडले आहेत. काही दिवसांपुर्वी बारूदगर नाला येथील एका नऊ वर्षीय बालकांचा मोकाट कुत्र्याच्या चाव्यामुळे मृत्यू झाला. या घटनेनंतर शहरातील नागरीक व विविध संघटनांकडून महापालिका प्रशासनावर टिका सुरु झाली.

सर्व पक्षीय नगरसेवकांनीही प्रशासनाला धारेवर धरत आगपाखड सुरु केली. त्यानंतर प्रशासनाने मोकाट कुत्रे पकडण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानूसार ११ ते २८ डिसेंबर दरम्यान या विशेष मोहिमेअंतर्गत आतापर्यत ५६५ मोकाट कुत्रे पकडण्यात प्रशासनाला यश आले. दोन टप्प्यात शहरातील ७ झोन मध्ये ही कारवाई करण्यात आली आहे तर पुढील दोन दिवसात झोन क्रमांक ८ व ९ मध्ये मोकाट कुत्रे पकडण्यात येणार असल्याचेही शेख म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2018 8:45 pm

Web Title: 550 dogs caught by aurngabad corporation
Next Stories
1 मतदारांत गैरसमज पसरवणाऱ्या विरोधात गुन्हा नोंदवणार – जिल्हाधिकारी
2 पाणीपुरवठ्याच्या प्रलंबित योजना मार्गी लावा
3 किल्लारी कारखाना सुरू करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच!
Just Now!
X