27 October 2020

News Flash

बारावीच्या परीक्षेसाठी जाताना दोघांचा अपघाती मृत्यू

कुंभारी फाट्याजवळ ट्रकची दुचाकीला जोराची धडक बसली.

(प्रतिकात्मक छायाचित्र )

भोकरदन कडून जालन्याकडे बारावीच्या परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू  तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. सुनील घुनावत आणि अनिल घुनावत असे अपघातातील मृतांचे नाव आहे. सुनीलच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर अनिल घुनावतवर उपचार सुरू असताना मृत्यू झाला. करण सुंदरडे हा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अनिल व करण हे बारावीला होते.

करण सुंदरडे व अनिल घुनावत हे दोघे रामेश्वर महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. दोघांचे भोकरदन येथे परीक्षा केंद्र आले होते. आज पहिलाच पेपर असल्याने परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहचण्यासाठी सुनील घुनावत याच्या दुचाकीवर जात होते. परीक्षेला जात असताना शहराजवळील जालना रोडवर असलेल्या कृषी कार्यालयासमोर त्यांचा अपघात झाला. विरुद्ध दिशेने भोकरदनकडून जालन्याकडे जाणाऱ्या ट्रकने त्यांना समोरासमोर धडक दिली. त्यामध्ये सुनील घुनावतच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्याचा जागील मृत्यू झाला. तर गंभीर जखमी असलेल्या अनिलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. करण सुंदरडेवर उपचार सुरू आहेत. जखमीला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2018 1:31 pm

Web Title: accidental death of student going to hsc exam on jalna bhokardan road
Next Stories
1 दूर गेली शाळा.. पटसंख्येचा मार चिमुकल्या जीवांना
2 औरंगाबादेत नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक; उप कुलसचिवांना अटक
3 औरंगाबादमध्ये कार अपघातात दोन डॉक्टरांचा मृत्यू
Just Now!
X