न मागताच पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दीड कोटींचे अग्रीम

महापालिकेतील कर्मचाऱ्यांना अग्रीम देण्याची प्रथा लातूर जिल्ह्य़ात एवढी वाढली, की अमित देशमुख राज्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे बॅनर लावण्यासाठीही कर्मचाऱ्याला ५० हजार रक्कम उचल देण्यात आली होती. ऊठसूट न मागता १ कोटी ४८ लाख ६२ हजार ७८८ रुपये कर्मचाऱ्यांना महापालिकेने दिले. माहिती अधिकारात मल्लिकार्जुन भाईकट्टा यांनी मिळविलेल्या कागदपत्रांत अग्रीम रकमेच्या अनेक सुरस कथा दडल्या आहेत. आमदार अमित देशमुखांचे उदाहरण हे त्यापैकीच एक.

Elon Musk
टेस्लातील १० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, एलॉन मस्क यांनी मेलद्वारे दिला इशारा; म्हणाले, “खर्च कमी करण्यासाठी…”
narendra modi sanjay singh
“तोट्यातल्या कंपन्यांकडून भाजपाला कोट्यवधींचं दान, काही कंपन्यांकडून नफ्याच्या ९३ पट देणग्या”, निवडणूक रोख्यांवरून आपचे गंभीर आरोप
2000 currency notes worth rs 8202 crore still in circulation
दोन हजारांच्या ८,२०२ कोटी रुपये मूल्याच्या नोटा आजही लोकांहाती!
Inconvenient as Sinnar buses go directly from the flyover without stopping at small villages
नाशिक: लहान गावांच्या थांब्यांना बससेवेची हुलकावणी

एकाही अधिकारी व कर्मचाऱ्याने अग्रीम पसे हवे असल्याचे अर्ज न करताच त्यांच्या नावावर मोठी रक्कम उचल देण्यात आली. माहिती अधिकारात अर्ज आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी रक्कम समायोजित करावी, अशा नोटिसा बजावण्यात आल्या. महापालिकेने दिलेल्या कागदपत्रात ओ. एस. मुतंगे यांच्याकडे १ लाख १० हजार रुपयांची उचल असून, त्यात १९ जून २०१४ रोजी आमदार अमित देशमुख राज्यमंत्री झाल्याने बॅनर लावण्यासाठी ५० हजार उचलीचा समावेश आहे. एन. व्ही. कलवले या अधिकाऱ्याकडे शहरातील खड्डे बुजवण्यासाठी अनामत ४ लाख रुपये व मुरूम टाकण्यासाठी ५० हजार रुपयांची उचल देण्यात आली आहे. एस. एम. बाजपाई यांच्याकडे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०१२ साठी घेतलेली २ लाख ९२ हजार ५०० रुपये अनामत रक्कम आहे. डी. डी. बिराजदार यांच्याकडे पाणीपुरवठय़ाच्या कामासाठी १ लाख रुपये अनामत आहे. पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी डी. जी. यादव यांच्याकडे १ लाख ७९ हजार रुपये अनामत रक्कम आहे. संजय कुलकर्णी यांच्याकडे २०१३ पासून विविध कामांसाठी २ लाख ९५ हजार रुपयांची अनामत रक्कम आहे.

अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १ कोटी रुपयांचे समायोजन केले असले तरी मुळात ही रक्कम त्यांची मागणी नसताना का देण्यात आली, याचा तपशील महापालिकेकडे उपलब्ध नाही. काही अधिकारी बदली होऊन गेले आहेत. त्यांच्याकडून अद्याप ही रक्कम वसूल करण्यात आलेली नाही. मंजुरी दिलेली रक्कम प्रायोजन, शपथपत्र, स्थायी ठराव व सर्वसाधारण सभेचा ठराव या बाबतीत माहिती उपलब्ध नसल्याचे महापालिकेने लेखी कळवले आहे.