लातूरकरांनी प्रारंभापासून नेतृत्व करण्याची संधी सातत्याने काँग्रेसला दिली. अनेक अडचणींवर मात करत लातूर विकसित होत आहे. या शहरात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी पुन्हा एकदा काँग्रेस निवडणुकीच्या िरगणात उभी असून लातूरकर याहीवेळी आपल्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वास आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केला.

भविष्यातील लातूर कसे असेल, याचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी काही नियोजन करण्यात आले आहे. शहरातील सांडपाण्यावर पाच टप्प्यांत प्रक्रिया केली जाणार असून ते पाणी पुन्हा उपयोगात आणले जाणार आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या उपायांना देशभरच फारसे यश आले नाही, त्यामुळे आगामी काळात शून्य कचरा व्यवस्थापन ही संकल्पना शहरवासीयांमध्ये रुजवून घरातील कचरा घरातच कसा खतनिर्मितीसाठी वापरता येईल याचे प्रशिक्षण दिले जाईल. जो सुका कचरा आहे त्यावर प्रक्रिया करून प्रभागनिहाय त्याचा वापर केला जाईल. शिवाय कचर्यापासून ब्लॉक तयार करून त्याच्या विक्रीची व्यवस्था केली जाणार आहे.

controversy, nitin Gadkari photo, agitation of congress, nagpur
मतचिठ्ठीवर गडकरींचे छायाचित्र, नागपुरात भाजप- काँग्रेसमध्ये वादावादी !
narendra modi
राहुल गांधी ‘शाही जादूगार’! गरिबी दूर करण्याच्या आश्वासनावरून पंतप्रधान मोदींची टीका
Manifesto of Samajwadi Party released
हमीभावासाठी कायदा करण्याचे आश्वासन; समाजवादी पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित
Sanjay Raut slams Congress
‘आलात तर तुमच्याबरोबर नाहीतर तुमच्या शिवाय’, संजय राऊत यांचा काँग्रेसला निर्वाणीचा इशारा

शहरातील प्रत्येक ५०० मीटर अंतरावर सार्वजनिक शौचालय व मुताऱ्या विकसित केल्या जाणार असून त्यासाठी महापालिकेबरोबर राज्यातील काही उद्योजकांचा सीएसआर फंड वापरला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात हे अंतर २५० मीटरवर आणण्याचे नियोजन आहे. गंजगोलाईचे हे शंभरावे वष्रे असून यानिमित्ताने शंभर कोटी रुपयांचा विकास आाराखडा तयार करण्यात आला आहे. शहरातील पाणी वितरण व्यवस्था अमृत योजनेंतर्गत दुरुस्त केली जाणार असून गेल्या दोन वर्षांच्या दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शहरवासीयांची पाणीपट्टी माफ करण्यात आली. मालमत्ताकरात सूट देण्यात आली. लोकांना विश्वासात घेऊन कर आकारणी व शहराच्या विकासाचा आराखडा तयार केला जाणार आहे. अगोदर पाणी वितरण व्यवस्था सुरळीत करून त्यानंतरच मीटरचा वापर केला जाईल. मागील काळात मीटरला झालेल्या विरोधामुळे अडचणी आल्या. आता लोकांना विश्वासात घेऊन नियोजन केले जाणार आहे. शहरातील रस्ते, वीज, स्वच्छता या व्यवस्था सुरळीत करण्याची प्रक्रिया निरंतर आहे.  महानगरपालिकेला केवळ पाच वष्रे झाले आहेत, त्यामुळे लातूरची तुलना थेट िपपरी चिंचवड अथवा सोलापूर महानगरपालिकेशी करता येणार नाही. आपले उत्पन्न विचारात घेऊनच नियोजन करावे लागणार आहे. शहर वाहतुकीसाठी नव्याने खासगी संस्थेशी झालेल्या करारानुसार सिटीबसेस सुरू होतील व त्याची आकारणी ऑटोरिक्षापेक्षा कमी असणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले.