सनातनवर बंदी घालण्याची िहमत सरकारमध्ये नाही. ‘दादरी’सारखे प्रकरण घडवून देशात अराजकता पसरविण्याचा डाव जातीयवादी संघटनांनी सुरू केला आहे. िहदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांवर सरकार कारवाई न करता बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे पाकिस्तानी अतिरेक्यांना भारतात हल्ले करण्यास सरकार प्रवृत्त करीत असल्याचा खळबळजनक आरोप भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष माजी खासदार अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला.
माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त अॅड. आंबेडकर नांदेडला आले होते. शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी वार्तालाप करताना त्यांनी सरकारवर कडाडून टीका केली. देशात भाजपचे सरकार आहे. निवडणुका समोर ठेवून समाजा-समाजात तेढ निर्माण करणाऱ्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सरकार मात्र बघ्याची भूमिका घेऊन अराजकता माजविण्यास जणू मूकसंमती देत असल्याचे चित्र निर्माण होत आहे. ‘दादरी’सारख्या घटना घडवून हे सरकार पाकिस्तानी अतिरेक्यांना भारतात हल्ले करण्यास प्रवृत्त करीत असल्याचा आरोपही अॅड. आंबेडकर यांनी केला.
महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आता शिल्लक राहिले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. डाव्या चळवळीचे नेते नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोिवद पानसरे यांच्यावर दिवसाढवळ्या गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यात पोलीस यंत्रणेला दोन वर्षांचा कालावधी लागत आहे. कॉ. पानसरे हत्या प्रकरणी कट्टर िहदुत्ववादी संघटना असलेल्या सनातनचा कार्यकर्ता पोलिसांच्या जाळ्यात सापडला. सनातनवर बंदी घालण्याची मागणी जोर धरत आहे. सनातनवर बंदी घालण्याची िहमत फडणवीस सरकारमध्ये नाही. मात्र, बंदी घालणे दूरच; भाजप बंदीची मागणीही करू शकत नाही. सरकारचा सनातनला पािठबा असल्याचा आरोप अॅड. आंबेडकर यांनी केला.
सनातन प्रभातमध्ये २०२३पर्यंत भारताला िहदूराष्ट्र करण्यासंदर्भात आक्षेपार्ह मजकूर छापून आला होता. त्यावेळी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार होते. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यावेळी सनातनवर कारवाई करण्याची िहमत दाखवली नाही. आता भाजपवाल्यांकडून बंदीची अपेक्षा करणे चूक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
‘थिंक टँक संकल्पना नसल्यामुळेच विरोध’!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्याची जी संकल्पना होती, त्यात फेरबदल करून फडणवीस सरकारने तयार केलेल्या योजनेला आपला विरोध आहे. फडणवीस सरकारच्या योजनेमध्ये ‘िथक टँक’ आंतरराष्ट्रीय स्मारकाची संकल्पना नसल्यामुळेच आपला या योजनेला विरोध आहे. महागाई वाढल्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीतही वाढ झाली पाहिजे. या साठी आपल्या पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अॅड. आंबेडकर यांनी दिली.