News Flash

नगरमधील चार बालिकांचा औरंगाबादमध्ये केला जाणार होता बालविवाह; ‘अंनिस’ने रोखले

संबंधित मुलींच्या पालकांना बजावल्या नोटिसा

प्रातिनिधिक छायाचित्र

नगर : भटक्या समाजात, औरंगाबाद जिल्ह्यत लावले जात असलेले तब्बल चार बालविवाह अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बुवाबाजी संघर्ष विभागाच्या राज्य सचिव अॅसड. रंजना गवांदे यांच्या सतर्कतेने थांबवले गेले. या चारही मुली नगर जिल्ह्यतील आहेत. मसणजोगी या भटक्या समाजातील अनिष्ट जातपंचायत गवांदे यांच्या प्रयत्नातून बरखास्त झाल्या. मात्र याच समाजातील पंचायतीचे पंच प्रतिष्ठेसाठी बालविवाह लावण्यात पुढाकार घेत असल्याचे आढळले आहे.

औरंगाबादमधील बिडकीन येथील दोन व लासुर स्टेशन येथील दोन असे एकूण चार विवाह गेल्या गुरुवारी व शुक्रवारी महिला बालकल्याण विभाग व पोलिस अधिकाऱ्यांच्या मदतीने थांबवले गेले आहेत. या घटनेतील मुली अवघ्या ९, १०, ११ व १३ वर्षांंच्या आहेत. बिडकीन येथे विवाह होत असलेल्या मुली शेवगाव तालुक्यातील तर लासुर स्टेशन येथे होत असलेल्या विवाहातील मुली नेवासा फाटा भागातील आहेत. या बालविवाहाची माहिती अॅड. गवांदे यांना मिळाली होती.

बिडकीन व लासुर स्टेशन परिसरातील वाडय़ा-वस्त्यांवर हे विवाह लावले जात होते. गवांदे यांनी महिला बालकल्याण व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला व संबंधित वाडय़ा-वस्त्यांवर जाऊन बालविवाह थांबवले. या चारही मुलींना आता त्यांच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यात आले असले तरी या मुलींना बालसुरक्षा समितीपुढे हजर करण्याच्या नोटिसा संबंधित पालकांना बजावल्या गेल्या आहेत. अॅड. गवांदे यांनी मसणजोगी या भटक्या समाजातील जातपंचायत बरखास्त करण्यासाठी पुढाकार घेतला होता. परंतु या पंचायतीचे पंच आता खोटय़ा प्रतिष्ठेसाठी बालविवाह लावण्यात पुढाकार घेत असल्याचे आढळत असल्याची माहिती त्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2021 11:04 am

Web Title: andhashraddha nirmulan samiti stopped four child marriages in aurangabad bmh 90
Next Stories
1 अभियांत्रिकी.. विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत
2 हिंदुत्वाच्या रिंगणात पुन्हा ‘संभाजीनगर’!
3 आता औरंगाबादमध्येही कास पठार; आठ टेकडय़ा फुलांनी बहरणार
Just Now!
X