News Flash

सुब्रतो रॉय यांना ग्राहक मंचाचा झटका; अटक वॉरंट जारी

नागरिकांच्या लेखी तक्रारीनंतर ग्राहक मंचाने हे वॉरंट जारी केले.

Subrata roy : सहारा समूहाकडून औरंगाबादमध्ये सहारा सिटी होम हा प्रकल्प राबवण्यात येणार होता.

औरंगाबादच्या सहारा सिटी होम प्रकल्पातील गुंतवणूकदारांनी तक्रार केल्यानंतर सुब्रतो रॉय यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. या प्रकल्पामध्ये अनेकजणांनी पैसे गुंतवले होते. मात्र, त्यांना घर किंवा गुंतवणूकीचा कोणताही परतावा मिळाला नव्हता. नागरिकांच्या लेखी तक्रारीनंतर ग्राहक मंचाने हे वॉरंट जारी केले.

सहारा समुहाची मालमत्ता विकत घेण्यात टाटा, गोदरेज, पतंजली इच्छुक

सहारा समूहाकडून औरंगाबादमध्ये सहारा सिटी होम हा प्रकल्प राबवण्यात येणार होता. त्यासाठी नागरिकांना १० टक्के भरून बुकिंग करायची होती. पुण्यातील‘अँबी व्हॅली’च्या धर्तीवरच औरंगाबादेत बीड बायपास रोडवर कंपनीने ८२ एकर जमिनीवर‘सहारा सिटी होम्स’या प्रकल्पाची योजना आखली होती. २०११ पासून या प्रकल्पात ग्राहकांनी अनामत रक्कम भरून बुकिंग केली. या माध्यमातून अंदाजे २० ते २५ कोटी रुपये जमा करण्यात आले. अमरजीत सिंह बग्गा आणि अनिल मोरेश्वर सावे यांनी २०११ साली घरासाठी रक्कम भरली होती. मात्र, चार वर्षानंतही त्यांना घर ही मिळालं नाही. त्यामुळे पैसे परत मागितले असता ते ही मिळाले नसल्यानं ग्राहक मंचाकडे धाव घेतली. याबाबत सहाराच्या संचालक मंडळाला २०१५ साली नोटीस पाठवण्यात आली. मात्र, या नोटीसला उत्तर न दिल्याने हे वॉरंट जारी करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2017 3:41 pm

Web Title: arrest warrant against subrata roy sahara city home project aurangabad
Next Stories
1 सेनेच्या घोटाळापुस्तिकेत चिक्कीचा त्रोटक उल्लेख
2 औरंगाबादमध्ये दोन तोतया पोलिसांना अटक
3 औरंगाबादेत विद्यार्थ्यांकडून सरकारविरोधात ‘भीक मागो’ आंदोलन
Just Now!
X