02 March 2021

News Flash

‘सनातन’ वर बंदी घालण्याची काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची मागणी

देशात इसीस या दहशतवादी संघटनेप्रमाणेच सनातन संस्था घातक आहे.

Ashok Chavan : मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष व मंत्रिमंडळातील १० मंत्र्यांचा ताफा राबूनही नांदेडकरांनी भाजपला नाकारत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या बाजूने पुन्हा एकदा कौल दिला आहे. काँग्रेसने ७१ जागांवर विजय मिळवला असून भाजपला ५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर शिवसेनेला केवळ १ जागा मिळाली आहे.

अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा दुरूपयोग होत असल्याचे प्रतिपादन

देशात इसीस या दहशतवादी संघटनेप्रमाणेच सनातन संस्था घातक आहे. ही काँग्रेसची भूमिका असून सनातन संस्थेवर बंदी घातली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी भूमिका काँग्रेसची असून अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा दुरूपयोग होत आहे. असे त्यांनी पत्रकार बठकीत मान्य केले.

खासदार चव्हाण हे सोनपेठ येथील कार्यकर्त्यांचा मेळावा आटोपून परभणीत पोहोचल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सुरुवातीलाच विलंब झाल्याबाबत दिलगिरी व्यक्त करताना परभणी जिल्ह्णा त दोन वर्षांत रस्त्यांची वाईट अवस्था झाली आहे, असे सांगितले. सध्या आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका निवडणुकीच्या पूर्व तयारीसाठी राज्यभरात बठका होत आहेत. काँग्रेसने जिल्ह्णात व राज्यात संघटनात्मक बदल केल्यामुळे त्याचे परिणाम चांगले दिसत आहेत, असे सांगितले.

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. महिला बलात्कार व अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. सरकारचा गुन्हेगारांवर अंकुश राहिलेला नाही. अशी टीका करून राज्याला पूर्ण वेळ गृहमंत्री असावा, ही अपेक्षा आहे. परंतु भाजप सरकार भूमिका घेत नाही. त्यामुळे सध्या पोलिसांवरही हल्ले वाढत चालले आहेत. गुंड प्रवृत्तींना राजाश्रय मिळत असल्यामुळे पोलिसांनाही कारवाई करण्यासाठी अवघड जात असल्याचे खासदार चव्हाण यांनी सांगितले.

गेल्या महिनाभरापासून पावसाने उघडीप दिल्यामुळे अजूनही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत. या आत्महत्यांची दखल घेणेच सरकारने सोडून दिले आहे. योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी देवू, असे सरकार सांगत आहे. ती योग्य वेळ कधी येणार असा सवाल उपस्थित करून सत्तेत सहभागी झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कर्जमाफीची मागणी करण्याऐवजी आता मंत्रिमंडळात भूमिका घ्यावी, असे त्यांनी सांगितले. सरकार सहकार क्षेत्रातील साखर कारखानदारी मोडीत काढण्याच्या प्रयत्नात आहे. या कारखान्याच्या साखरेच्या साठय़ावर निर्बध घातले आहेत, असा सरकारच्या कारभारावर हल्ला करीत काही ठिकाणी दुष्काळी अनुदान व पीकविमा मिळाला नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत, असे ते म्हणाले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आघाडी करून किंवा स्वबळावर लढविण्याचे अधिकार जिल्हा पातळीवर देण्यात आले आहेत. निवडणुकीनंतर आघाडी करण्याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेतले जाईल, असे ते म्हणाले. पाण्याच्या बाबतीत सरकारने समन्यायी पाणी वाटपाची भूमिका घेतली पाहिजे. कारण जिल्ह्णा -जिल्ह्णात, विभागा-विभागात सध्या वाद सरू आहेत. असे त्यांनी सांगितले.

या पत्रकार बठकीला संपर्क  प्रभारी डी. पी. सावंत, जिल्हाध्यक्ष सुरेश वरपडूकर, केशवराव औताडे, तुकाराम रेंगे पाटील, भगवान वाघमारे, नदीम इनामदार, रवी देशमुख, सिद्धार्थ हत्तीअंबीरे उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2016 1:05 am

Web Title: ashok chavan comment on sanatan sanstha
Next Stories
1 ‘कोपर्डी’च्या तपासाबाबत ग्रामस्थांचा पोलीसांवर आरोप
2 रोहयो कामावर मृत अन् अपंग व्यक्ती
3 मुख्यमंत्र्यांनी वेळ न दिल्यास आंदोलन
Just Now!
X