News Flash

सरकारला शेतीतले कळत नाही- अशोक चव्हाण

बंदी असणाऱ्या औषधांना परवानगी दिल्याचा आरोप

अशोक चव्हाण

मराठवाड्यात बोंड अळीच्या वाढलेल्या प्रादुर्भावाच्या गंभीर प्रश्नावर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. ज्या औषधांवर जगभरात बंदी आहे, त्या औषधांना भारतात विक्रीची परवानगी दिली गेली. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांचा फवारणीदरम्यान मृत्यू झाला. शेतकऱ्यांची आस्था असणारा कृषीमंत्री नसल्यामुळेच ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, असे चव्हाण यावेळी म्हणाले. शेतकरी प्रश्नावर हिवाळी अधिवेशनात सरकारला घेरण्याची तयारी काँग्रेसकडून केली जात आहे. त्याच्या पूर्वनियोजनासाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत आज औरंगाबादमध्ये मराठवाड्यातील कार्यकर्त्यांची विभागीय बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला.

शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. मात्र, अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नाही. सोयाबीन,कापूस या पिकांना बाजार भाव नाही. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला असताना ठोस उपाय योजना केली गेलेली नाही. या सर्व प्रश्नावर हिवाळी अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसकडून आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक औरंगाबादमध्ये घेण्यात आली. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातून काँग्रेस कार्यकर्त्यांनी बैठकीला हजेरी लावली होती. या मोर्चात सर्वपक्ष सहभागी होणार असून दीड लाख नागरीकांचा मोर्चा नागपूरला धडकणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2017 6:25 pm

Web Title: ashok chavan target on bjp government in aurangabad
Next Stories
1 विकासासाठी स्वतंत्र मराठवाडा राज्य आवश्यकच!
2 एक चहाचा कप रेशीमबंध जुळवणारा..!
3 अधिवेशनाच्यावेळी शिवसेना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलत नाही: धनंजय मुंडे
Just Now!
X