औरंगाबादमधील पुंडलिक भागातील नगरसेवक आत्माराम पवार यांच्यावर मंगळवारी दुपारी अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. हल्ल्यात जखमी झालेल्या पवार यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. खासदार चंद्रकांत खैरे यांनी देखील पवार यांची रुग्णालयात भेट घेत प्रकृतीबाबत विचारपूस केली.
आत्माराम पवार यांच्यावर मंगळवारी दुपारी अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. हा हल्ला राजकीय वादातून झाली की वैयक्तिक वादातून हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आल्याचे सांगितले जाते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 30, 2018 5:03 pm