औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील मदरशामधील मुलांना खिचडीतून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. २२ विद्यार्थ्यांना उपचारासाठी बिडकीनमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

शेंदूरवाडा येथील मदरशामधील विद्यार्थ्यांना नाश्त्यामध्ये खिचडी देण्यात आली होती. संध्याकाळच्या जेवणातील शिल्लक राहिलेली खिचडी त्यांना नाश्त्यासाठी देण्यात आली होती.मात्र खिचडी खाल्ल्यावर विद्यार्थ्यांना मळमळ आणि उलटीचा त्रास होऊ लागला. या विद्यार्थ्यांना तातडीने शेंदूरवाडा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण रुग्णालयात डॉक्टर नसल्याने या मुलांना तिथून बिडकीनला हलवण्यात आले. सध्या मुलांवर बिडकीन ग्रामीण रुग्णालयात सध्या मुलावर उपचार सुरु आहेत. मदरशामध्ये ८५ मुलं शिक्षण घेतात. त्यापैकी २ जणांना विषबाधा झाली असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.