महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद शहरातील करोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. आज, गुरूवारी सकाळी औरंगाबादमध्ये ५५ नव्या करोनाबादितांची भर पडल्यामुळे शहरातील एकूण रूग्णांची संख्या ७४२ झाली आहे.

औरंगाबाद शहरात जुन्या भागांसह नवीन भागातही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहेच. शिवाय गेल्या १३ दिवसांत १२ कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. औरंगाबाद शहरात गुरुवारी सकाळी ५५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती टास्क फोर्सच्या अध्यक्ष डॉ. कानन येळीकर यांनी दिली.

या ठिकाणी सापडले नवीन रूग्ण –
भीमनगर – 15, पाडेगाव – 1, उस्मानपुरा – 7, सिल्कमिल्क कॉलनी – 1, कांचनवाडी – 1, नारळीबाग – 1, आरटीओ – 2, गरम पाणी – 1, बन्सीलाल नगर – 1, सातारा – 8, हुसेन कॉलनी – 2, दत्त नगर – 1, न्याय नगर – 2, पुंडलिक नगर – 1, संजय नगर – मुकुंदवाडी – 3, गुरू नगर – 1, नंदनवन कॉलनी – 1, गारखेडा – 1, शहनुरवाडी – 1, पंचशील दरवाजा – 1, बेगमपुरा – 1, अन्य 2

घाटीमध्ये ५६ जणांवर उपचार
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथील घाटीच्या डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल (डीसीएच) ५६ कोविड पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यापैकी ४२ रुग्णांची स्थिती सामान्य आहे. चार रुग्णांची स्थिती गंभीर आहे, असे घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले.