News Flash

औरंगाबाद विमानतळाच्या विस्तारीकरणात निधीची अडचण!

मूर्तिजापूर व चिकलठाणा या तीन गावांतील जमीन विस्तारीकरणासाठी लागणार आहे.

दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर, पर्यटन या क्षेत्रांत वाढ व्हावी म्हणून औरंगाबादच्या विमानतळ विस्तारीकरणासाठी लागणाऱ्या १८२ एकर जागेच्या भूसंपादनासाठी तब्बल ६०० कोटी रुपयांची आवश्यकता भासणार आहे. आता भूसंपादनानंतर बाधित होणाऱ्या कुटुंबीयांनी त्यांचे प्रश्न मांडायला सुरुवात केली आहे. ज्या बाजूला धावपट्टी वाढावयाच्या आहेत, त्याच्या विरुद्ध बाजूला ती वाढवावी, अशी मागणीही होऊ  लागली आहे. मात्र, विमानतळ विस्तारीकरणाचे काम  झाल्यास औरंगाबादमध्ये मोठय़ा आकाराच्या विमानांची ये-जा करणे शक्य होऊ शकेल. त्यातून दळणवळण वाढून उद्योग आणि पर्यटनात वाढ होऊ शकेल.

औरंगाबाद शहराजवळील मुकंदवाडी, मूर्तिजापूर व चिकलठाणा या तीन गावांतील जमीन विस्तारीकरणासाठी लागणार आहे. सिडकोने विकसित केलेल्या ५ हेक्टर ३६ आर म्हणजे सुमारे १३ एकर क्षेत्रात ३१६ मालमत्ता बाधित होणार आहेत. तसेच खासगी व म्हाडाने विकसित केलेल्या ११ जागाही संपादित होणार आहेत. यामध्ये सुमारे ३५० बांधलेली घरे आहेत. चिकलठाणा परिसरात १५५ एकर जागा विस्तारीकरणासाठी लागणार आहे. यामध्ये ६३० घरे तसेच ५२ शेतकऱ्यांची ८१ एकर जमीन विस्तारीकरणामध्ये प्रस्तावित आहे. अकृषीकरणास मान्यता असलेले ६३५ भूखंडही विस्तारीकरणामध्ये येणार असल्याने यासाठी ६०० कोटींहून अधिक रुपये लागण्याची शक्यता आहे. ही रक्कम उभी करण्याची तयारी राज्य सरकारने दाखवली आहे. पर्यटन आणि उद्योगाला चालना देण्यासाठीचा हा निर्णय योग्य असला त्याला गती कशी मिळते, यावर बरेच काही अवलंबून आहे.

असे असेल भूसंपादन

औरंगाबादच्या विमानतळाला यापूर्वीच आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देण्यात आला आहे. बद्धीस्ट सर्किटसाठी हवाई वाहतूक अधिक गरजेची आहे. तसेच अँकर प्रकल्पासाठी विमानतळ विस्तारीकरण आवश्यक असल्याचे सांगण्यात येते. विमान सेवेतील त्रुटींमुळे अनेक उद्योग औरंगाबाद येथे येण्यास तयार नव्हते. राज्याच्या मुख्य सचिवांनी या अनुषंगाने उद्योजकांनाही आश्वासन दिल्याने विमानतळ विस्तारीकरणाच्या प्रक्रिया अधिक गतीने होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे.

01

02

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2016 1:31 am

Web Title: aurangabad airport land funding problem
Next Stories
1 राष्ट्रवादीचे नेते लाल दिवा टिकवण्यासाठी निवडणूक रिंगणात – पंकजा मुंडे
2 अंबाजोगाईत काँग्रेस उमेदवाराला पैसे वाटताना प्रतिस्पर्धी उमेदवारांनी पकडले
3 चमत्कार घडलाच नाही !
Just Now!
X