News Flash

औरंगाबादला करोनाचा विळखा, रुग्णसंख्या १३२७

मंगळवारी २२ करोनाबाधित रुग्णांची वाढ

संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात करोना व्हायरसचा धोका दिवसागणिक वाढतच चालला आहे. मंगळवारी औरंगाबाद जिल्ह्यात २२ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. आज आढळलेल्या रूग्णांमध्ये ११ महिला आणि ११ पुरुषांचा समावेश आहे. आज वाढलेल्या रूग्णामुळे औरंगाबादमधील करोनाग्रस्तांची एकूण संख्या १३२७ इतकी झाल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

घाटीतून १३ करोनामुक्त, पाच जणांचा मृत्यू

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) १३ करोनाबाधितांवर यशस्वी उपचार झाल्याने ते सोमवारी घरी परतले आहेत. करोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये बेगमपुरा, गोगा बाबा मंदिर, उस्मानपुरा, गांधी नगर, हिमायत नगर, रेंगटीपुरा, मकसूद कॉलनी, अक्सा मस्जिद, बारी कॉलनी, शहा बाजार, वैजापूर, अन्वा-भोकरदन या भागातील आहेत. औरंगाबाद शहरातील चार आणि सिल्लोड येथील एका करोनाबाधिताचा अशा एकूण पाच कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे घाटी प्रशासनाने सांगितले. घाटीत आतापर्यंत ५० कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. सध्या घाटी रुग्णालयात ७० कोरोनबाधितांवर उपचार सुरू असल्याचेही प्रशासनाने कळवले आहे.

कोविड केअर केंद्रातून ८९ करोनामुक्त –
मनपाच्या कोविड केअर केंद्रातून सोमवारी एकूण ८९ करोनाबाधितांना ते बरे झाल्याने सुटी देण्यात आली. तर शहरातील दोन खासगी रुग्णालयात आतापर्यंत चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे, असे मनपा प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.

मंगळवारी आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) –
जुना मोंढा (1), बायजीपुरा (1), रोहिदासपुरा (1), कांचनवाडी (1), भारतमाता नगर हडको(1), नवीनवस्ती जुनाबाजार (4), जुना हनुमान नगर (1), हनुमान चौक (1), न्याय नगर (1), कैलाश नगर (1), रामनगर (1), एन 8 सिडको (4), रोशन गेट (1), एन11 सुभाषचंद्र नगर (1), पुंडलीक नगर (1), भवानी नगर (1) या भागातील कोरानाबाधित आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2020 8:58 am

Web Title: aurangabad coronavirus update nck 90 2
टॅग : Coronavirus
Next Stories
1 औरंगाबाद @१३०१; आतापर्यंत करोनामुळे ५० जणांचा मृत्यू
2 खासदार कराड यांच्या मुलांकडून भाजप कार्यकर्त्यांलाच मारहाण
3 मराठवाडय़ात मद्यनिर्मितीस सुरुवात
Just Now!
X