महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबादमधील परिस्थिती दिवसागणिक चिंताजनक होत चालली आहे. जिल्ह्यात आज, सोमवारी सकाळी १६ रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या करोनाबाधितांची एकूण संख्या १३०१ झाल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.

रविवार रात्रीपर्यंत ६१९ रुग्णांनी यशस्वीरित्या करोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यात ५० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे सोमवारी सकाळपर्यंत ६३२ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

औरंगाबादमध्ये आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. सुभाषचंद्र बोस नगर, एन 11, हडको (4), भवानी नगर (2), रोशन गेट (1), हुसेन कॉलनी (1), बायजीपुरा (1), इटखेडा, पैठण रोड (1), अल्तमश कॉलनी (1), जवाहर नगर, गारखेडा परिसर (1), शाह बाजार (1), मयूर नगर, एन-6, सिडको (1), राम नगर, एन 2 (1), गजानन मंदिर परिसर (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 10 महिला आणि सहा पुरूष रुग्णांचा समावेश आहे.