18 November 2019

News Flash

मनुष्यबळाअभावी खुल्या तुरुंगातील कैद्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

पैठणमधून सहा महिन्यांत कैद्यांचे दुसऱ्यांदा पलायन

पैठणमधून सहा महिन्यांत कैद्यांचे दुसऱ्यांदा पलायन

खुल्या कारागृहातील कैद्यांवर पुरेशा मनुष्यबळाअभावी लक्ष ठेवण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पठण येथील कारागृहातून सहा महिन्यांत दुसऱ्यांदा कैदी फरार झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली असून त्याला अपुऱ्या मनुष्यबळाचे कारण सांगितले जात आहे.

कैद्यांच्या मानसिकतेत सकारात्मक सुधारणा व्हावी आणि त्यांचे पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने खुल्या कारागृहाची संकल्पना पुढे आली. चित्रपती व्ही. शांताराम यांच्या ‘दो आँखे बारह हाथ’ या चित्रपटातून मांडलेली ती संकल्पना होती. या चित्रपटात मांडलेल्या संकल्पनेच्या धर्तीवर राज्यात काही ठिकाणी महिला व पुरुषांसाठी खुल्या कारागृहांची निर्मिती झाली. पठण आदी ठिकाणी पुरुषांचे, तर पुणे, अकोला येथे महिलांसाठी खुले कारागृह सुरू करण्यात आले.

बलात्कार, खंडणीखोर, टोळीयुद्ध करणारे, मुलांचे अपहरण व खून करणारे, दहशतवादाशी संबंधित, मादक पदार्थाची तस्करीच्या गुन्ह्यतील कैदी वगळता इतर काही गुन्ह्यंमध्ये एक तृतीयांश शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांची खुल्या कारागृहात प्रवेश देण्यासाठी निवड  केली जाते.

पठण येथील खुल्या कारागृहात सध्या ३७५ कैदी असून त्यांच्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ पाहता कैद्यांवर लक्ष ठेवण्यावर बंधने येतात, असे कारागृहातील सूत्रांकडून सांगण्यात येते. मंगळवारी रात्री एकऱ्या जयराम भोसले (रा. एरंडगाव ता. शेवगाव) याने सुरक्षा व्यवस्थेला गुंगारा देत पलायन केले. त्यासंदर्भातील गुन्हा पठण पोलीस ठाण्यात दाखल झाल्याची माहिती कारागृहाचे तुरुंगाधिकारी असद झुबेर मोमीन यांनी दिली.

खुल्या कारागृहातून सहा महिन्यांपूर्वी जगताप आडनावाचा एक कैदी पळून गेला होता. जगताप याला पुण्यातील येरवडा कारागृहातून चांगल्या वर्तणुकीच्या कारणावरून पठणच्या खुल्या कारागृहात आणण्यात आले होते. मात्र त्याने तकलादू सुरक्षा व्यवस्था पाहून पलायन केले होते. नंतर त्याला शोधून अटक करण्यात आली. आता पुन्हा कैदी पळाल्यामुळे कारागृहांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गृहरक्षक दलाचे जवान तैनात

पठणच्या खुल्या कारागृहासाठी ३६ सीसीटिव्ही बसवण्यात आलेले आहेत. याशिवाय काही गृहरक्षक दलाच्या (होमगार्ड) जवानांची मागणी केली होती. त्यानुसार ९ जवान दाखल झालेले आहेत. पलायन केलेल्या कैद्याचा तातडीने शोध घेण्यात येईल. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.   – असद मोमीन, तुरुंगाधिकारी, पठण.

 

जायकवाडीचे बांधकाम कैद्यांकडून!

पठणमध्ये जायकवाडी धरण निर्मितीचा निर्णय घेतल्यानंतर त्याचे बांधकाम करण्यासाठी काही बंदिवानांना आणण्यात आले होते. जायकवाडी धरणाचे काही प्रमाणातील बांधकाम हे बंदिवानांकडून करून घेण्यात आले होते, अशी माहिती कारागृह प्रशासनातील काही सूत्रांकडून मिळाली.

First Published on June 14, 2019 1:12 am

Web Title: aurangabad jail
Just Now!
X