औरंगाबाद-जालना रस्त्यावरील करमाड येथे भरधाव ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने तो थेट एका दुकानात घुसला. यामध्ये रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या सुमारे २० हून अधिक जणांना या कंटेनरने चिरडले व दुकानात घुसला. करमाड येथे आज आठवडी बाजार असल्याने रस्त्याच्या कडेला दुकाने लावण्यात आली आहेत. त्यामुळे रस्त्यावर प्रचंड गर्दी होती. चार जण गंभीर जखमी आहेत. जखमींना खासगी वाहनाने रूग्णालयात दाखल करण्यात आले.
जालन्याहून औरंगाबादकडे कंटेनर भरधाव जात होता. कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्याचे अचानक चालकाच्या लक्षात आले. करमाड येथील आठवडा बाजारमधून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या कलिंगड आणि कापसाच्या दुकानात घुसला. यामध्ये रस्त्याच्या बाजूला उभे असलेले सुमारे २० हून अधिक लोक चिरडले गेले. त्यांना त्वरीत औरंगाबादच्या घाटी रूग्णालयात दाखल करण्यात आले. कंटेनरच्या धडकेत अनेक वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे.
अपघातानंतर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. त्यामुळे अनेककाळ वाहतूक खोळंबली होती. जखमींपैकी चार जण गंभीर आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 19, 2018 1:42 pm