News Flash

औरंगाबादचा लॉकडाऊन स्थगित ; जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

सर्वपक्षीय विरोधानंतर निर्णय

संग्रहीत

औरंगाबादेत ३१ मार्चच्या मध्यरात्रीपासून टाळेबंदी लागू होणार होती. ३१ मार्चपूर्वी हीच टाळेबंदी ३० मार्चच्या मध्यरात्रीपासून लागू होणार होती. त्यात सोमवारी अंशतः बदल करत ३१ मार्चच्या मध्यरात्रीपासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, मंगळवारी रात्री उशिरा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी टाळेबंदीचा निर्णय तूर्त स्थगित करण्यात आल्याचे माध्यमांना सांगितले. दरम्यान, टाळेबंदीविरोधात एमआयएमचे खासदार इम्तीयाज जलील यांनी ३१ मार्च रोजी मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. भाजप, मनसे, वंचित बहुजन आघाडीनेही विरोध दर्शवला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 30, 2021 11:05 pm

Web Title: aurangabad lockdown postponed collector decision abn 97
Next Stories
1 सलग पाचव्या दिवशी दीड हजारावर रुग्ण
2 टाळेबंदीसदृश परिस्थितीने फुलशेती कोमेजली
3 अंगणवाडी सेविकांचे मोबाइल रिचार्ज अनुदान रखडले
Just Now!
X