औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ घालणाऱ्या एमआयएमच्या पाच नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. एमआयएमच्या नगरसेवकाकडून राजदंड पळवण्याचा प्रयत्नही करण्यात आला. यामुळे नदंकुमार घोडे यांनी एका दिवसासाठी पाचही नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द केलं आहे.

औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला आज गोंधळातच सुरुवात झाली. एमआयएमच्या नगरसेवकांनी खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाच्या प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावावरुन गोंधळ निर्माण झाला. इतर खासदारांचंही अभिनंदन करण्यात यावं असा आक्षेप यावेळी घेण्यात आला. यावेळी एमआयएमच्या नगरसेवकाकडून राजदंड पळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर महापौर नदंकुमार घोडे यांनी एका दिवसासाठी पाचही नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द केलं आहे.

यानंतर भाजपाच्या महिला नगसेवकांनी पाण्यावरुन गोंधळ घालण्यास सुरुवात केली होती. सत्ताधारी भाजपाच्या महिला नगरसेवकांनी महापौरांसमोरच ठिय्या आंदोलन केल्याने पुन्हा एकदा गोंधळ निर्माण झाला होता.