News Flash

औरंगाबाद पालिका भरती घोटाळ्याची तुकाराम मुंढेंकडून चौकशी

कोणत्याही दबावाला न जुमानता काम करत

तुकाराम मुंढे

औरंगाबाद महापालिकेत २०१० ते २०१४ या चार वर्षांच्या कालावधीत २५० कर्मचाऱ्यांची भरती झाली. ही भरती नियमबाह्य असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याबाबतची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने तुकाराम मुंढे यांची नियुक्ती केली आहे. त्यासाठी बुधवारी मुंढे पालिकेत दाखल झाले असून आयुक्तांच्या कक्षात चौकशी समितीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. मूळचे बीड जिल्ह्यातील असलेल्या तुकाराम मुंढे यांचे शिक्षण औरंगाबादमध्येच झाले आहे. पालिकेत दाखल झाल्यानंतर त्यांनी कर्मचारी भरती प्रक्रियेतील कागदपत्रांची तपासणी सुरु केली आहे. दरम्यान चौकशी समितीचा अहवाल गोपनीय असल्यामुळे या मुद्यावर मुंढेंनी कोणतेही भाष्य केले नाही. सायंकाळी ५ वाजेपर्यंत चौकशी चालेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

आपल्या धडाकेबाज कार्यपद्धतीने मुंढे यांनी विशेष ओळख निर्माण केली आहे. राजकीय किंवा अन्य कोणत्याही दबावाला न जुमानता काम करत असल्यामुळे जनतेत त्यांची लोकप्रियता पाहायला मिळते. त्यामुळेच त्यांना पाहण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यामध्ये उत्सुकता दिसून आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2017 2:18 pm

Web Title: aurangabad municipal recruitment scam inquiry tukaram munde
Next Stories
1 कोठे आहेत अशोक चव्हाण?
2 दु:ख व्यक्त करण्यापेक्षा युद्ध करा; शिवसेना खासदार चंद्रकांत खैरेंचा मोदींना सल्ला
3 औरंगाबादमध्ये अज्ञाताकडून पुन्हा दुचाकीची होळी
Just Now!
X