14 August 2020

News Flash

औरंगाबादमध्ये करोना रुग्णांचे प्रमाण ११ टक्क्यांवर

 औरंगाबादमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२ वरून ५९ वर गेले आहे.

जगभरात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, आयसीसीच्या नवीन नियमाप्रमाणे क्रिकेट बोर्ड एका दौऱ्यावर जाताना मोठा संघ पाठवत आहेत.

प्रति दशलक्ष लोकसंख्ये मागे ७४ हजार २३५ चाचण्यांचे प्रमाण वाढवत औरंगाबाद महापालिका चाचण्यांचा वेग वाढवत आहे. गोवा, दिल्ली राज्यांपेक्षाही चाचणीची आकडेवारी पुढे जाणारी असल्याचा दावा महापालिकेकडून केला जात आहे. त्याचबरोबर गेल्या महिन्यात करोना रुग्ण सापडण्याचे शेकडा प्रमाण २८ वरुन ११ पर्यंत खाली आले आहे. तसेच रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १९ दिवसांहून ३१ दिवसांवर गेला आहे. दहा दिवस करण्यात आलेल्या टाळेबंदीमध्ये चाचण्याच्या बदलत्या पद्धती आणि प्रमाणामुळे करोना हाताळणीमध्ये मोठे बदल झाले असल्याचा दावा महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी केला आहे. दरम्यान, औरंगाबादमध्ये करोनामुळे निर्माण झालेला गुंता नव्या चाचण्यांमुळे सुटू शकतो, असे चित्र निर्माण होताना दिसत आहे.

औरंगाबादमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२ वरून ५९ वर गेले आहे. चाचण्यांच्या पद्धतीमध्ये अँटिजेन चाचण्यांचा केलेला प्रयोग अधिक लाभदायक होत असल्याचे दिसून येत आहे. टाळेबंदीमध्ये सहा पटीने चाचण्या वाढविण्यात आल्या. टाळेबंदीपूर्वी दररोज ७०० पर्यंत चाचण्यांचा वेग गाठला जात होता. मात्र, आता दररोज सरासरी पाच हजार चाचण्या होतात. टाळेबंदीपूर्वी म्हणजे १० जुलपूर्वी सरासरी १५० ते २०० रुग्ण आढळून येत. आता सहापट चाचण्या वाढवून दीडपट रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णवाढ होत आहे, याचा अर्थ यंत्रणा अधिक वेगाने काम करत आहे.

दरम्यान, दहा जुलैपासून ४७ चमूंमार्फत चाचण्याचे काम होत आहे. यामध्ये शहरांच्या हद्दीवरील प्रत्येक रस्त्यावर सहा, रेल्वेस्थानक परिसरात दोन चमू १२ तास काम करत आहेत. चाचणी घेणारे आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे कामाचे तास कमी करावेत, यासाठी अधिक जणांची नियुक्ती करण्यावर भर असणार आहे. त्याच बरोबर शहरात ३५ जणांची टीम काम करत आहे. गेल्या काही दिवसांत सारे जण थकले आहेत. पण आणखी काही दिवस याच वेगाने काम करावे लागणार आहे. या व्यक्तींचे कामाचे तास कमी करता यावेत असे प्रयत्न आहेत, पण त्यासाठी करोनाबाधितांची संख्या कमी होण्याची वाट बघावी लागेल.

शहरातील चाचण्यांचा वेग वाढविताना पोलीस, विविध शासकीय कार्यालये त्याच बरोबर जेथे अनेकांचा अधिक संपर्क येईल अशी ठिकाणे निवडली जात आहेत. दरम्यान, शहरात करोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाणही काहीसे घटले असल्याचा दावा केला जात आहे. गंभीर अवस्थेत रुग्ण येण्याचे प्रमाण कमी केल्यास मृत्यूचे प्रमाण कमी होते. परिणामी ती कार्यपद्धती अनुसरली जात आहे.

चाचणी कार्यपद्धतीमधील बदल सकारात्मक

जरी करोना रुग्णांचा आलेख खाली घसरला, तरी शहरात येणाऱ्या रस्त्यावरील चाचणी केंद्र चालूच राहतील. आरटी-पीसीआर आणि अँटिजेन चाचणी पद्धतीचा योग्य वापर ही करोना हाताळणीची अधिक योग्य कार्यपद्धती ठरू शकते. औरंगाबादमध्ये केल्या जाणाऱ्या चाचण्या-रुग्णसंख्या याचा आलेख मंदावण्यासाठी आणखी कालावधी जावा लागेल. या महिनाअखेर चित्र बरेच स्पष्ट झाले असेल. आता चाचणी पद्धत सोपी आणि जलद झालेली असल्याने परिस्थितीमध्ये बदल होऊ शकतील.

– अस्तिककुमार पांडये, आयुक्त महापालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2020 12:11 am

Web Title: aurangabad the proportion of corona patients is 11 percent abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 विषाणूचा पाठलाग करताना..!
2 जायकवाडीवरील ‘सिंचन ठेकेदारीला’ विरोध
3 जायकवाडीच्या सिंचनासाठी ‘ठेकेदारी’चा घाट
Just Now!
X