07 August 2020

News Flash

लोकसंख्येच्या प्रमाणात चाचण्यांमध्ये औरंगाबाद राज्यात अव्वल

शहरात प्रतिदशलक्ष लोकसंख्येमागे ७१८२८ चाचण्या

संग्रहित छायाचित्र

करोना विषाणूचा पाठलाग करत  प्रतिदशलक्ष लोकसंख्येच्या प्रमाणात करोनाचाचणी करणारे औरंगाबाद शहर हे राज्यातील पहिल्या तर देशात दुसऱ्या क्रमांकाचे शहर ठरले. शहरात आजवर प्रतिदशलक्ष लोकसंख्येमागे ७१८२८ या दराने चाचण्या झाल्या आहेत. तर देशात गुवाहटीमध्ये हा दर सर्वाधिक आहे.

दहा दिवसांची टाळेबंदी आणि चाचण्यांमध्ये अग्रेसर राहण्याचे धोरण महापालिकेने हाती घेतल्यामुळे जून महिन्यातील शंभर तपासण्यामागे २२ रुग्ण सापडण्याचे प्रमाण आता ८.६४ ने खाली आले. महिनाभरातील मृत्यूचा दर आता ५.९ वरून ४.१ पर्यंत खाली आला आहे. दरम्यान दूध, भाजी, मटण, अंडी, केशकर्तनालय, किराणा दुकानदारांना चाचणी सक्तीची केल्याने त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. महिनाभरापूर्वी बिघडलेली परिस्थिती हाताळत गतीने चाचण्या करण्याच्या महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांच्या कामाचे उच्च न्यायालयानेही एका आदेशात कौतुक केले आहे.

शहरातील करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासनावर गेल्या महिन्यात टीका सुरू होती. यामुळे १० ते १८ जुल या कालावधीमध्ये टाळेबंदी लावण्यात आली. मात्र, त्याच वेळी चाचण्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. जून महिन्यात सरासरी ६५० चाचण्यांचा वेग पाच हजारांपर्यंत वाढविण्यात आला. परिणामी महिनाभरापूर्वी लक्षणे नसणारे व सौम्य लक्षणे असणारे रुग्णाचे प्रमाण वाढले आता उपचार होऊन बरे होण्याचे प्रमाण ५९ टक्क्य़ांवरून ७३ टक्क्य़ांपर्यंत वाढले आहे.

विक्रेते आणि व्यापाऱ्यांसाठी चाचणी बंधनकारक केल्यामुळे २४ तारखेपर्यंत दररोज सरासरी सात हजार चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये ९९२ विक्रेत्यांना करोनाबाधा असल्याचे आढळून आले. एकूण ८५ हजार ५४४ अ‍ॅन्टीजेन आणि ३६ हजार २८४ आरटी-पीसीआर चाचण्या करण्यात आल्या. शहरात येणाऱ्या सहा प्रमुख मार्गावर चाचण्या केल्यानंतर बाहेरून शहरात येणारे बाधित करोनाबाधिताचे प्रमाणही दहा टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे. तर शहरातील विविध प्रतिबंधित क्षेत्रातील करोनाबाधितांचे प्रमाण दोन ते अडीच टक्केच असल्याचे विश्लेषण केले जात आहे.

आतापर्यंत १० हजार चाचण्यांमध्ये ११०० रुग्ण आढळून आले आहेत. आजवरची एकूण आकडेवारी पाहिली असता प्रतिदशलक्ष लोकसंख्येमागे शहरातील चाचण्यांचा हा दर ७१८२८ एवढा राहिला आहे. हा दर राज्यात अव्वल तर देशात दुसऱ्या क्रमांकाचा असल्याचे आयुक्त पांडेय यांनी सांगितले.

फक्त टाळेबंदीने फारसे यश हाती लागत नाही. संसर्गाचा पाठलाग करून त्याला पकडताना चाचण्या हाच इलाज असल्याचे दिसून येत आहे. दहा दिवसांची टाळेबंदी आणि त्यामध्ये सर्वाधिक चाचण्यांचा परिणाम जुलमध्ये दिसून येत आहे. पण अजून विषाणू निघून गेला नाही. पूर्वीच्या गतीने वावर वाढला तर संसर्ग वाढू शकतो. पण महिनाभर सतत काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांमुळे काही करोना संसर्गाला अटकाव होत आहे.

– अस्तिककुमार पांडेय, आयुक्त महापालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2020 12:08 am

Web Title: aurangabad tops state in population scale tests abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 ‘कोविड सेंटर’मधील दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा
2 वाढत्या प्रसारामुळे उस्मानाबाद, लातूरमध्ये पुन्हा टाळेबंदीचा प्रयोग
3 अंधुरेच्या पत्नीची याचिका निकाली
Just Now!
X