वीज वितरण कंपनीचे कंत्राट घेण्यासाठी औरंगाबादमध्ये आलेल्या दोन तरुणांचा अपघातात दुर्दैवी अंत झाला. नितीन राठोड (वय २९ वर्ष) आणि उत्तमराव डिगोळे (वय २९ वर्ष) अशी या तरुणांची नावे असून दोघेही कन्नडचे रहिवासी होते.

नितीन आणि दत्ता हे दोघेही चांगले मित्र असून गेल्या काही वर्षांपासून दोघेही वीज वितरणसाठी कंत्राटदार म्हणून काम करत होते. वीज वितरणाचे औरंगाबादमधील कंत्राट मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. याच कामानिमित्त सोमवारी दोघेही औरंगाबादमध्ये आले होते. सोमवारी रात्री काम आटपून दोघेही दुचाकीवरुन कन्नडला घरी परतण्यासाठी निघाले. मध्यरात्री १२ च्या सुमारास दौलताबादजवळ अब्दीमंडी येथे त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. धडक देणाऱ्या वाहनचालकाने रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या तरुणांना मदत करण्याऐवजी घटनास्थळावरुन पळ काढला. स्थानिकांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी दोन्ही तरुणांना रुग्णालयात दाखल केले. पण तोपर्यंत दोघांची प्राणज्योत मालवली होती.
दौलताबाद पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक शेख साबेर याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Pimpri, Kiwale, pimpri mnc,
पिंपरी : किवळेतील दुर्घटनेनंतर पालिकेला जाग; होर्डिंगधारकांना दिला ‘हा’ इशारा
Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
heavy traffic jam for two hours in dombivli
डोंबिवली दोन तासांपासून अभूतपूर्व वाहतूक कोंडीत; रविवारी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना फटका
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी