News Flash

जागेच्या वादातून पत्नीने मुलाच्या साथीने केली पतीची हत्या

नारेगावात मंजूर शेख (वय ५०) हे भाड्याच्या खोलीत राहत होते. मंजूर यांनी दोन लग्न केले होते.

(संग्रहित छायाचित्र)

औरंगाबादमधील नारेगावातील शेख मंजूर शेख यांच्या हत्येचे गूढ अखेर उकलले आहे. पत्नी आणि मुलाने शेख यांची हत्या केली असून या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तसलीम बेगम व शेख सलमान अशी या आरोपींची नावे आहेत.

नारेगावात मंजूर शेख (वय ५०) हे भाड्याच्या खोलीत राहत होते. मंजूर यांनी दोन लग्न केले होते. मंजूर यांचा औरंगाबादमध्ये प्लॉट असून हा प्लॉट आपल्या नावावर करुन द्यावा, यासाठी तसलीम बेगम आणि मुलगा सलमान यांनी त्यांच्याकडे तगादा लावला होता. तर मंजूर यांची दुसरी पत्नीही प्लॉटसाठी पतीशी भांडण करायची. गेल्या शनिवारी रात्री तसलीम आणि मंजूर यांच्यात त्या प्लॉटवरुन भांडण झाले. यानंतर तसलीम आणि सलमान या दोघांनी त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला.

भावाच्या मृत्यूची माहिती मिळताच मंजूर यांच्या दोन भावांनी खुनाचा संशय घेत अंत्यसंस्कार थांबवले. पोलिसांनी परिस्थितीचा अंदाज घेत संशयावरुन तसलीम, सलमान आणि जावयाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. अखेर पाच दिवसांनी त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2019 5:05 pm

Web Title: aurangabad wife son killed husband over property dispute
Next Stories
1 तिरंगा बनविणाऱ्या हातांना जगण्याची भ्रांत
2 फळबागा सुकल्या, शेतकरी हैराण ; मराठवाडय़ात चाऱ्याची टंचाई कायम
3  ‘टँकर आवडे सर्वाना’!
Just Now!
X