औरंगाबाद शहरातील करोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्कय़ाहून अधिक आहे. रविवारी सकाळी ६४ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण करोनाबाधितांची संख्या २०१४ झाली आहे. आजारातून बरे झालेल्या व्यक्तींची संख्या औरंगाबादमध्ये दिवसागणिक वाढत आहे. आतापर्यंत ११८४ जणांना करोनावर मात केली आहे. औरंगाबादमध्ये ५१४ जणांनावर उपचार सुरू आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ९९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता ७३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये २७ महिला आणि ३७ पुरूष रूग्णांचा समावेश आहे.

शनिवारी औरंगाबाद शहरातील हर्सूल कारागृह परिसरात २९ जणांना करोनाबाधा झाली. एका बाजूला शहरातील दुकाने उघडण्याची प्रक्रिया सुरू असताना झालेली ही रुग्णवाढ चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

कारागृह बंद असताना लागण कशी?
करोना विषाणूची लागण तपासणीसाठी कारागृहातील ११० कैद्यांच्या लाळेचे नमुने तपासण्यात आले होते. त्यातील २९ जणांना लागण झाली आहे. कारागृह बंद असताना विषाणू पोहोचला कसा, याचा शोध घेण्यासाठी कोणत्या सकारात्मक व्यक्तीच्या संपर्कात कोणते कर्मचारी आले होते, हे तपासण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आल्याचे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी नीता पाडाळकर यांनी सांगितले. शहरातील कारागृहाची क्षमता ५७९ एवढी असून सध्या औरंगाबादमधील हार्सूल करागृहात १८०० कैदी आहेत.

जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. भावसिंगपुरा (1), बजाजनगर, वाळूज (1), हिना नगर, रशीदपुरा (1), सातारा परिसर (1), बौद्ध नगर (1), मिल कॉर्नर (11), रोजा बाग (1), देवदूत कॉलनी, बजाज नगर (1), देवानगरी (1), पद्मपुरा (1), एन नऊ,रेणुका माता मंदिर परिसर (1), एन तीन सिडको (1), सिंधी कॉलनी (1), मुजीब कॉलनी रोशन गेट(1), नंदीग्राम कॉलनी, गारखेडा (1), शिवाजी नगर (1), रवींद्र नगर, टिळक नगर जवळ (1), भीमनगर, जवाहर कॉलनी (1), जुना मोंढा (1), शिवशंकर कॉलनी, साई नगर (3), मुकुंदवाडी (1), संत ज्ञानेश्वर नगर, एन –नऊ (1), तक्षशील नगर, मोंढा (3), संभाजी कॉलनी एन सहा (1), चिश्त‍िया कॉलनी (2), पैठण गेट (2), पुंडलिक नगर, गल्ली नं. नऊ (1), आंबेडकर नगर, गल्ली नं. नऊ (3), ठाकरे नगर (1), आंबेडकर नगर, एन-सात (2), बायजीपुरा (2), जटवाडा रोड (1), जुना मोंढा, भवानी नगर (1), नागसेन कॉलनी, बायजीपुरा (1), न्यू हनुमान नगर (1), बारी कॉलनी (1), आंबेडकर चौक, पिसादेवी रोड (2), कैलास नगर (1), शहानूर मियाँ दर्गाह परिसर, ज्योती नगर जवळ (1) आणि देवशी पिंपळगाव, गंगापूर (3), बोरवाडी, खुलताबाद (1) या भागातील कोरानाबाधित आहेत.