30 October 2020

News Flash

चिंताजनक! औरंगाबादमध्ये करोनाबाधितांची संख्या ८०० च्या पुढे

शुक्रवारी सकाळी ७४ करोनाबाधितांची वाढ

प्रतिकात्मक छायाचित्र

औरंगाबाद शहरात आज, शुक्रवारी सकाळी ७४ करोनाबाधितांची वाढ झाली आहे. जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ८२३ झाल्याची माहिती औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने दिली आहे.  शहरात गुरूवारी ६२ नव्या करोनाबाधितांची वाढ झाली होती. यामध्ये ३४ पुरूष आणि २८ महिलांचा समावेश होता.  चिंताजनक बाब म्हणजे शहरातील उस्मानपुरा भागातील अवघ्या अठरा महिन्याच्या बाळाला करोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल आला आहे. दिवसभरात एकुण १० मुलं बाधीत आढळले. यात सहा मुली व चार मुलं असून यामध्ये १८ अठरा महिने ते सोळा वर्ष असे त्यांचे वय आहेत.

मागील दोन दिवसांत शहरातील पाच करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. गुरूवारी पहाटे हुसेन कॉलनीतील ५५ वर्षीय महिलेचा करोना व इतर आजाराने मृत्यू झाला. आता शहरातील मृतांचा आकडा चिंताजनक असून तो २० वर पोचला आहे. घाटीमध्ये आज 10 जणांचा स्वॅब घेण्यात आला, त्यांचे अहवाल येणे बाकी आहेत. परंतु कालच्या नमुन्यातील दहा जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. सध्या मिनी घाटीत ८५ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असल्याचेही त्यांनी कळविले आहे.

१७ तारखेच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा आणि वैद्यकीय सेवा वगळता औरंगाबाद शहरातील सर्व आस्थापना, दुकाने बंद ठेवण्याचे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले आहेत. आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देशही संबंधित यंत्रणांना दिले.

औरंगाबाद शहरातील आज, शुक्रवारी आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

एन सहा,सिडको (2), बुढीलेन (1), रोशन गेट (1), संजय नगर (1), सादात नगर (1), भीमनगर, भावसिंगपुरा (2), वसुंधरा कॉलनी (1), वृंदावन कॉलनी (3), न्याय नगर (7), कैलास नगर (1), पुंडलिक नगर (8),सिल्क मील कॉलनी (6), हिमायत नगर (5), चाऊस कॉलनी (1), भवानी नगर (4), हुसेन कॉलनी (15), प्रकाश नगर (1)
शिव कॉलनी गल्ली नं. 5, पुंडलिक नगर (1), हुसेन कॉलनी, गल्ली नं. 5 (2), रहेमानिया कॉलनी (2), बायजीपुरा (5), हनुमान नगर (1), हुसेन नगर (1), अमर सोसायटी (1), न्यू हनुमान नगर, गल्ली नं.1, दुर्गा माता मंदिर (1) या भागातील कोरोनाबाधित असल्याचेही त्यांनी कळविले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2020 10:39 am

Web Title: aurngabad coronavirus update nck 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 औरंगाबादमध्ये १८ महिन्याच्या बाळाला करोना; रुग्णसंख्या @७४९
2 औरंगाबादमध्ये ५५ नव्या करोनाबाधितांची भर
3 औरंगाबादच्या जवानाला वीरमरण
Just Now!
X