औंरगाबादमध्ये करोनाचा विळखा वाढतच चालला आहे. औरंगाबादमधील करोनाबाधितांची संख्या हजारांच्या पुढे गेली आहे. शहरात आज, सोमवारी सकाळी ५९ करोनाबाधितांची वाढ झाल्यानं शहरातील एकूण रूग्णांची संख्या १०२१ झाली आहे.

आतापर्यंत ३१२ रुग्ण बरे होऊन घरी परतल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. महानगरपालिकेच्या कोविड केअर सेंटर, जिल्हा सामान्य रुग्णालय (मिनी घाटी) आणि शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय (घाटी) या ‍ठिकाणी कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. या यंत्रणेतील डॉक्टर्स, परिचारिका, ब्रदर्स, आरोग्य कर्मचारी, सेवक आदी कोरोना वॉरिअर्सच्या अथक परिश्रमातून व यशस्वी उपचारानंतर आजपर्यंत एकूण ३१२रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत. महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमधून आतापर्यंत सर्वात अधिक म्हणजे १८० रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत. तर जिल्हा सामान्य रुग्णालयातून ११२ रुग्ण बरे झालेले आहेत. तसेच घाटीतून २०रुग्ण बरे झालेले आहेत, असेही कळविलेले आहे.

औरंगाबाद शहरात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. पैठण गेट, सब्जी मंडी (1), किराडपुरा (1), सेव्हन हिल कॉलनी (1), एन-6 सिडको (1), बायजीपुरा (1), रोशन नगर (1), न्याय नगर (3), बहादूरपुरा, बंजारा कॉलनी, गल्ली नं.2 (4), हुसेन कॉलनी (4), पुंडलिक नगर (2), हनुमान नगर (1), संजय नगर, गल्ली नं. पाच (1), हिमायत बाग, एन-13 ‍सिडको (1), मदनी चौक (2), सादाफ कॉलनी (1), सिल्क मील कॉलनी (8), मकसूद कॉलनी (6), जुना मोंढा (11), भवानी नगर (5), हिमायत बाग, जलाल कॉलनी (3), बेगमपुरा (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 27 महिला व 32 पुरुषांचा समावेश आहे.