05 December 2019

News Flash

औरंगाबाद : चार वर्षांच्या चिमुकलीचा पराक्रम, दोन तासात सर केला हरिश्चंद्रगड

औरंगाबादमधील चार वर्षाच्या चिमुकलीने कौतुकास्पद कामगिरी केली आहे.

औरंगाबादमधील चार वर्षाच्या चिमुकलीने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. २७ जानेवारी रोजी मन्नत मिन्हास या चार वर्षाच्या मुलीने अवघ्या दोन तासांत हरिश्चंद्रगड  सर केला. मन्नतने गड सर करताना चिप्स आणि जेम्सच्या गोळ्या सारखे हलकेफुलके खाद्य मन्नतने सोबत ठेवलं होते, अशी अशी माहिती एव्हरेस्टवीर मनिषा वाघमारे यांनी दिली.

मन्नत मिन्हासचा जन्म २२सप्टे२०१४ रोजी रोजी झाला. तिची आई वुडरिच शाळेत क्रिडा प्रशिक्षक आहे. तर वडिल अवतार मिन्हस लघूउद्योजक आहेत. मिन्हास कुटुंब मूळचे हरियाणातील आहे. गेल्या ३६ वर्षांपासून औरंगाबादेत चे स्थायिक झाले आहेत. डिसेंबर२०१८ मधे कलावंतीण दुर्गही मन्नतने आईसोबत सर केला होता.

गेल्या काही महिन्यापासून मन्नत आणि आई माधवी विद्यापीठ परिसरातील गोगा टेकडीवर ट्रेंकिगसाठी जात होते. यावेळी वाघमारे यांच्याशी माधवी यांची गिर्यारोहण मोहिमेसंदर्भात चर्चा झाल्यानंतर मन्नतनेही आई कडे गिर्यारोहणासाठी सोबत येण्याचा हट्ट धरला. बालहट्ट म्हणून माधवी यांनी तो पुरवताच त्यातून छोटी गिर्यारोहकच तयार झाली.

२०२४ मधे माऊंटएव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी औरंगाबादेतून मनिषा वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली टीम तयार होत आहे. त्यामध्ये मन्नतची निवड होण्याची शक्यता आहे.

First Published on February 3, 2019 1:30 pm

Web Title: aurngabad harishchandra gad mannat 4 years girl
Just Now!
X