जिल्ह्यत आत्महत्या केलेल्या ३९ शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे निराधार स्वावलंबन योजनेंतर्गत ऑटोरिक्षा परवाना इरादापत्र जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना ऑटोरिक्षा परवाना इरादापत्र देण्याचा उपक्रम राज्यात प्रथमच उस्मानाबाद जिल्ह्यात राबविण्यात आला. तो स्तुत्य असल्याचे डॉ. नारनवरे यांनी सांगितले. जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींची बठक घेऊन महिला रिक्षाचालक फेडरेशनची स्थापना करावी अशी सूचना केली, तसेच जिल्ह्यातील ऑटोरिक्षा चालकांनी परवाने नूतनीकरण करून घ्यावे अन्यथा संयुक्तिक कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी या वेळी दिला.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी या योजनेची माहिती दिली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली घाडगे, लातूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रभाकर भालेराव या वेळी उपस्थित होते.