पीक विम्याच्या पशासाठी पंधरा दिवस बँकेत खेटे मारताना दोन तरूण शेतकऱ्यांच्या नजरेला रोज पसे घेऊन जाणारी गाडी पडली. अनेक दिवस चकरा मारून पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत, शेतात फारसे काही पिकत नाहीत, या परिस्थितीने या तरुणांच्या मनात बँकेच्या पशाची गाडीच लुटण्याचा विचार पक्का झाला. दोन दिवस पाळत ठेवून अखेर या तरुणांनी चित्रपटातील खलनायकाप्रमाणे अध्र्या रस्त्यात गाडी अडवून तब्बल १५ लाख रुपये लुटले. पसे शेतात पुरून ठेवले. मात्र गुन्ह्य़ात वापरलेली दुचाकी लपवण्याची शक्कल आठवली नाही आणि पोलिसांनी त्यांना पकडले.

गेवराई तालुक्यातील बागिपपळगाव येथील शंकर दामोदर शेंडगे आणि ऋषिकेश श्रीहरी महानोर (वय २२) हे दोघेही तरुण शेतकरी. पीक विम्याच्या निमित्ताने दोन-तीन दिवस बँकेतून रक्कम घेऊन निघणारी गाडी धोंडराई शाखेकडे कोणत्या रस्त्याने जाते, सोबत किती लोक असतात. याची इत्थंभूत माहिती मिळवली. गुरुवार, १४ जुल रोजी नेहमीप्रमाणे दोघे आपल्या दुचाकीवरून शेतात गेले. शेतातून बँकेत आले. रक्कम घेऊन टाटा मॅझिक ही गाडी धोंडराईच्या दिशेने धावू लागताच गाडीचा पाठलाग सुरू केला. गेवराई शहरापासून २० कि.मी. अंतरावर दुचाकी आडवी लावून सोबत आणलेली मिरचीची पूड गाडीतील दोघांच्या डोळ्यात टाकून काही कळण्याच्या आत गाडीतील १५ लाख रुपयांची रक्कम असलेली पेटी घेऊन दोघांनी धूम ठोकली. पसे लुटल्यानंतर शेतात येऊन एका बाभळीच्या झाडाखाली खड्डा करून पेटी पुरली. मात्र त्यांचा प्रयत्न फसला.