27 October 2020

News Flash

भाजप जिल्हा कार्यालय वर्षभरात हायटेक होणार

गोदावरी नदीचे उगमस्थान असलेल्या नाशिक जिल्ह्यात पक्षाने जिल्हा कार्यालयासाठी जागा घेतली.

bjp : सत्ता स्थापनेपासून विरोधकांच्या भूमिकेत वावरणाऱ्या सेनेने गेल्या काही दिवसांत दुष्काळ आणि पाणी टंचाईच्या मुद्द्यावरून मित्रपक्ष असलेल्या भाजपला सुनाविण्याची एकही संधी सोडलेली नाही.

गोदावरी नदीचे उगमस्थान असलेल्या नाशिक जिल्ह्यात भाजपचे जिल्हा कार्यालय स्थापण्यासाठी जागा खरेदी झाल्यानंतर पक्षाने या नदीच्या नाभीस्थानी असलेल्या नांदेड जिल्ह्यात पक्षाच्या कार्यालयासाठी सुमारे सव्वाकोटी रुपये खर्च करून म्हाळजा शिवारात जागा खरेदी केली. येत्या वर्षभरात भाजपचे ‘हायटेक’ जिल्हा कार्यालय उभे राहील, असे मानले जाते.
नांदेड शहरात काँग्रेसचे नवीन मोंढय़ात, तर राष्ट्रवादीचे कलामंदिर परिसरात जिल्हा कार्यालय आहे. जोडकाँग्रेस वगळता इतर कोणत्याही पक्षाचे कार्यालय नाही. किंबहुना अन्य कोणत्याही पक्षाने कार्यालय उभारण्याचे प्रयत्न केले नाहीत. राष्ट्रीय पक्ष अशी ओळख असलेल्या भाजपचे जिल्ह्यात स्वतंत्र कार्यालयच नाही. गेल्या वर्षी १५ मे रोजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या बठकीत प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र व सुसज्ज कार्यालय उभारण्याची संकल्पना मांडण्यात आली. या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी आता हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यात जागा खरेदी करण्यासाठी नाशिकचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण सावजी यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
गोदावरी नदीचे उगमस्थान असलेल्या नाशिक जिल्ह्यात पक्षाने जिल्हा कार्यालयासाठी जागा घेतली. ३ एप्रिलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येथील बांधकामाचे भूमिपूजन होणार आहे. गोदावरी नदीचे नाभीस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेडमध्ये गेल्या काही महिन्यांपासून जागा खरेदीचे प्रयत्न सुरू होते. अनेक जागा बघितल्यानंतर म्हाळजा शिवारात असलेल्या टोके परिवाराची जागा पक्ष पदाधिकाऱ्यांनी मान्य केली. मंगळवारी सुमारे १ कोटी १७ लाख ६८ हजार मोजून १ एकर जागा खरेदी करण्यात आली.
अमित शहा यांनी जागा खरेदीची जबाबदारी नाशिकचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण सावजी यांच्यावर सोपवली होती. सोमवारी लक्ष्मण सावजी नांदेडात दाखल झाले. दुपारी दुय्यम निबंधक कार्यालयात भाजपचे माजी शहराध्यक्ष अॅड. चतन्य ऊर्फ बापू देशमुख, जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, शहराध्यक्ष संतुक हंबर्डे, माजी कोषाध्यक्ष बालाजीराव देशपांडे यांच्या उपस्थितीत जागा खरेदी-विक्रीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. पक्षाने जागा खरेदी केल्याने आगामी काळात भाजप कार्यकर्त्यांना हक्काचे कार्यालय उपलब्ध होणार आहे.
अॅड. चतन्यबापू देशमुख यांनी सांगितले, की जागा खरेदीची प्रक्रिया गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. वर्षभरात येथे पक्षाचे हायटेक जिल्हा कार्यालय उभे राहील, त्यासाठी पक्षाने ५० लाख निधी दिला आहे. मुंबईचे प्रख्यात वास्तुविशारद अरिवद शहापूरकर नव्या वास्तूचा आराखडा तयार करणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकारचे कार्यालय सुरू करण्याची पक्ष नेतृत्वाची भूमिका आहे. अशाच प्रकारची कार्यालये झाल्यानंतर प्रशिक्षणाचे किंवा थेट संवाद असेल तो सुलभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जम्मू-काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत एकाच वेळी कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण होईल व प्रबोधनही पार पडेल, असे ते म्हणाले. वर्षभरात नांदेडचे कार्यालय कार्यकर्त्यांना उपलब्ध होईल, असा दावा त्यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 30, 2016 3:30 am

Web Title: bjp district office high tech will be a year
टॅग Bjp,District
Next Stories
1 नाथषष्ठीनिमित्त थेट नाथसागरात स्नान
2 ‘तुम्ही मला साथ द्या, मी तुम्हाला सत्ता देतो’
3 राज्यभरात जलयुक्त शिवारचा नुसताच ‘झपाटा’
Just Now!
X