30 September 2020

News Flash

औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपचा झेंडा

काँग्रेसचा पराभव

औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीवरील काँग्रेसची सत्ता संपुष्टात आली आहे. अविश्वास ठरवानंतर झालेल्या सभापती पदाच्या निवडणुकीत शुक्रवारी भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवला. भाजप विरुद्ध काँग्रेस यांच्यात थेट झालेल्या लढतीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. भाजपचे उमेदवार राधाकिशन पठाडे यांनी १३ विरुद्ध ४ मतांनी काँग्रेस उमेदवार राहुल सावंत यांचा पराभव केला.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय औताडे यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या ठरावावर २२ ऑगस्टला मतदान झालं. त्यावेळी ठरावाच्या बाजूने बहुमत झाल्यामुळे औताडे यांना सभापतीपदावरून पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर सभापतीसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत भाजपकडून राधाकिशन पठाडे तर काँग्रेसकडून राहुल सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शुक्रवारी त्यावर हात उंचावून मतदान झालं. पठाडे यांना १३ तर सावंत यांना ४ मते मिळाली. एक सदस्य तठस्थ राहिला. गेल्या महिनाभरापासून चर्चेत असलेल्या या निवडणुकीत भाजपने एकतर्फी विजय मिळवला. विजयानंतर भाजपकडून मोठा जल्लोष करण्यात आला. कृषीउत्पन्न बाजार समितीची एकूण सदस्य संख्या १८ असून यात व्यापारी- २, हमाल-२, ग्रामपंचायत- ५, सोसयटी- ९ अशी स्थिती आहे. यामध्ये भाजपचे ७ तर काँग्रेसचे ६ संचालक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2017 9:25 pm

Web Title: bjp win market committees chairmanship in aurngabad
Next Stories
1 औरंगाबादेत तरुणाची धारदार शस्त्राने हत्या
2 शौचालय असेल तरच बोला! सभापतींच्या कार्यालयातील पाटी ठरतेय लक्षवेधी
3 वस्तू व सेवाकर विभागाचा तुघलकी कारभार
Just Now!
X