News Flash

ब्लॅकमेल प्रकरण तक्रारदारांवर उलटले- दोन प्राचार्यावर अत्याचाराचा गुन्हा

बारावी परीक्षेत उत्तीर्ण करण्याचे आमिष दाखवून आपल्यावरच लंगिक अत्याचार झाल्याची तक्रार दिली. या प्रकरणी दोन प्राचार्यासह शिक्षक व मध्यस्थ महिलेविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

शारीरिक संबंधाची चित्रफीत तयार करून प्राचार्याकडून दीड लाख रुपयांची खंडणी घेताना अटक केलेल्या तरुणीची शनिवारी जामिनावर सुटका होताच, या तरुणीने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन बारावी परीक्षेत उत्तीर्ण करण्याचे आमिष दाखवून आपल्यावरच लंगिक अत्याचार झाल्याची तक्रार दिली. या प्रकरणी दोन प्राचार्यासह शिक्षक व मध्यस्थ महिलेविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकारामुळे ब्लॅकमेल प्रकरण तक्रारदारांवरच उलटल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
बीड तालुक्यातील एका प्राचार्याची त्याच्या मत्रिणीने औरंगाबाद शहरात शिक्षणासाठी राहात असलेल्या बुलडाणा येथील तरुणीची ओळख करून दिली. त्यानंतर प्राचार्याचे तरुणीबरोबर संबंध जुळले. दरम्यान, तरुणीने शारीरिक संबंधाची चित्रफीत तयार करून ५० लाख रुपयांची मागणी प्राचार्याकडे केली. मोठय़ा रकमेच्या मागणीमुळे हैराण झालेल्या प्राचार्याने तक्रार देताच पोलिसांनी भ्रमणध्वनीवरून प्रकरणाची सत्यता तपासून संबंधित तरुणीला ९ डिसेंबर रोजी बीड बसस्थानकात तक्रारदाराकडून दीड लाख रुपये घेताना अटक केली. त्यावेळी तिच्यासोबतचा साथीदार पसार झाला. न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी दिल्यानंतर शनिवारी सायंकाळी तिची जामिनावर सुटका झाली. यानंतर अॅड. संगीता धसे व काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या तरुणीला आधार दिल्यावर तिने पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्यासमोर तरुणीने बारावी परीक्षेत उत्तीर्ण करतो, असे आमिष दाखवून प्राचार्याने व शिक्षकाने आपले लंगिक शोषण केले, तर एक प्राचार्य सातत्याने संबंधाची मागणी करीत होता. या प्राचार्यापासून आपणास दिवस गेल्याने आपण दवाखान्यासाठी पशाची मागणी केली होती. मात्र, प्राचार्याने ब्लॅकमेिलग प्रकरणात आपल्याला अडकवले, असे सांगत आपल्यावरच लंगिक अत्याचार झाल्याची तक्रार दिली.
पोलिसांनी रात्री इनकॅमेरा जबाब घेऊन दोन प्राचार्य, शिक्षक व मध्यस्थ महिला यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून प्रकरण औरंगाबाद पोलिसांकडे वर्ग केले. तरुणीच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून तरुणीचा फरार साथीदार अटक झाल्यानंतर या प्रकरणातील सर्व वस्तुस्थिती समोर येईल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2015 1:56 am

Web Title: blackmail issue offence to principal
टॅग : Principal
Next Stories
1 रोहयो कामांची कारवाई दोन महिन्यांनंतरही नाही
2 रेल्वेखाली सापडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
3 वृद्ध महिलेचा गळा चिरून खून
Just Now!
X