News Flash

औरंगाबादमध्ये नववर्षाचं सेलिब्रेशन जीवावर, मद्यप्राशन करुन परतताना BMW विहिरीत पडून दोघांचा मृत्यू

देशभरात नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आले. पण, औरंगाबादमध्ये नववर्षाच्या सेलिब्रेशनला गालबोटं लागले आहे. 

देशभरात नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आले. पण, औरंगाबादमध्ये नववर्षाच्या सेलिब्रेशनला गालबोटं लागले आहे.  औरंगाबादजवळ असलेल्या दौलताबाद किल्ल्यासमोर भीषण अपघात झाला असून यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मद्यप्राशन करुन परतताना BMW विहिरीत पडून दोघांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना औरंगाबादमधील घाटी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अपघातातमधील पाचही जण औरंगाबादमधील रोकडा हनुमान कॉलनीमधील रहिवाशी असल्याचे समोर आले आहे. एमएच 20 इएफ 0707 या क्रमांकाच्या BMWने पाचही जण मध्यपान करून निघाले होते.

थर्टीफस्ट पार्टी करुन रात्री दोन वाजता पाचही जण BMW कारमधून निघाले होते. उपस्थितांनी दिलेल्या माहितीनुसार, दौलताबाद किल्ल्याजवळ असलेल्या घाटावरून कार प्रचंड वेगाने येऊन थेट विहिरीत कोसळली. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 9:13 am

Web Title: bmw accident in aurngabad two dead nck 90
Next Stories
1 ‘नागरिकत्वा’मुळे ससेहोलपट थांबली
2 नवे वर्षे ‘मोबाइल पोलीस ठाण्यां’चे
3 एमआयएमच्या सहा नगरसेवकांची हकालपट्टी
Just Now!
X