News Flash

औरंगाबादमध्ये ‘पद्मावती’ चित्रपटाविरोधात शिवसेना रस्त्यावर

अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर

'पद्मावती'चित्रपटाल विरोध करण्यासाठी शिवसैनिक रस्त्यावर

‘पद्मावती’ चित्रपटाच्या विरोधात आता शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. ‘पद्मावती’ चित्रपटावर बंदी घालावी, या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने औरंगाबदमधील महाराणा प्रताप उद्यानासमोर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनामुळे शिवसेनेची अंतर्गत गटबाजी पुन्हा समोर आली आहे. शिवसेना जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या आंदोलनापासून खासदार चंद्रकांत खैरे यांनी अंतर ठेवलं. आठ्वड्याभरातील शिवसेनेचं दुसरं आंदोलन आहे. ज्यामध्ये खासदार चंद्रकांत खैरे सहभागी झालेले नाहीत.

इतिहास आणि स्त्रियांचा आदर करणारा हिंदुस्थान राणी पद्मवतींचा अपमान सहन करणार नाही, शिवसेना पक्ष हिंदू रक्षणासाठी काम करतो. हिंदू धर्मातील राणीचा अपमान करणाऱ्या लोकांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. ‘पद्मावती’ चित्रपटावर महाराष्ट्रात बंदी घालावी, अन्यथा शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेनं दिलाय. यावेळी ‘पद्मावती’ चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि चित्रपटात राणी पद्मवतीची भूमिका साकारणारी दीपिका पदुकोन यांच्यासोबत सेन्सॉर बोर्डाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात खड्डे प्रश्नावर शिवसनेने दोन दिवसांपूर्वी आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनात शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे गैरहजर होते. आज पुन्हा खैरे यांची गैरहजेरी होती. त्यामुळे शिवसेनेत अंतर्गत गटबाजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसते आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2017 4:36 pm

Web Title: bollywood film padmavati protests from shivsena
Next Stories
1 संयम बाळगा, योग्य शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ मिळेल: गिरीश बापट
2 अंगणवाडय़ांबाबतचे धोरण अनास्थेचेच
3 व्हॉट्सअॅपवरुन सामूहिक कॉपीचा प्रकार, चार जण ताब्यात
Just Now!
X