19 October 2019

News Flash

हळदीत राडा, औरंगाबादमध्ये तरुणाची हत्या

हळदीचा कार्यक्रम सुरु असताना आकाश आणि सचिनमध्ये नाचण्यावरून पुन्हा वाद झाला.

आकाश सेन्ट्रीग काम करतो तर सचिन सिडकोतील महाविद्यालयात शिकत आहे.

भाचीच्या हळदीच्या कार्यक्रमात सख्ख्या चुलत भावांमध्ये नाचण्यावरून झालेल्या वादातून अल्पवयीन मुलाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आकाश मारोती शेळके (वय २०) असे मृताचे नाव असून हत्येनंतर आरोपी पसार झाला आहे.

चिकलठाण्यातील ऋषीकेश नगर शुक्रवारी रात्री हळदीचा कार्यक्रम होता. सचिन दशरथ शेळके आणि त्याचा चुलत भाऊ आकाश मारोती शेळके यांच्यात जुना वाद होता. आकाश सेन्ट्रीग काम करतो तर सचिन सिडकोतील महाविद्यालयात शिकत आहे. या दोघांच्या भाचीच्या हळदीचा कार्यक्रम शुक्रवारी होता.

हळदीचा कार्यक्रम सुरु असताना आकाश आणि सचिनमध्ये नाचण्यावरून पुन्हा वाद झाला. वाद वाढल्याने सचिन शेळकेने आकाशला चाकूने भोसकले. जखमी आकाशला नातेवाईकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.

औरंगाबादमधील घटना ताजी असतानाच भिवंडीतही अशाच स्वरुपाची घटना घडली आहे. भिवंडीतही हळदीदरम्यान झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली.

First Published on May 11, 2019 3:17 pm

Web Title: boy murdered during haldi ceremony at chikalthana