10 April 2020

News Flash

भांडणातून भावाला पेटवले

शनिवारी रात्री रेल्वेस्टेशन परिसरातील बनेवाडी भागात ही घटना घडली.

(संग्रहित छायाचित्र)

गहान ठेवलेला मोबाइल सोडवूण घेण्यासाठी लागणाऱ्या पैशांवरून भांडण झाल्याच्या निमित्तावरून एका भावाने दुसऱ्याला पेटवल्याची घटना शनिवारी रात्री रेल्वेस्टेशन परिसरातील बनेवाडी भागात घडली. वेदांतनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरूण मुकुंदा कुमावत हा मिस्त्री म्हणून काम करतो. त्याचा सावत्र लहान भाऊ सोमेश हा बिगारी काम करतो. शनिवारी रात्री दहाच्या सुमारास दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यावरूनच झोपलेल्या वरूणच्या अंगावर सोमेशने दुचाकीतील पेट्रोल बाटलीत काढून ते ओतले. भावाला पेटवून दिल्यानंतर घराच्या खोलीचा दरवाजा बाहेरून बंद करून पसार झाला. परिसरातील नागरिकांनी वरूणची आरडा-ओरड ऐकून घटनास्थळी धाव घेतली. त्याला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2020 1:17 am

Web Title: brother was set on fire by a quarrel abn 97
Next Stories
1 ‘स्वाभिमानी’ आता महापालिका निवडणुकीच्या आखाडय़ात
2 ‘पानगळ’ लांबली
3 न्यायालयीन लढाईनंतरही परिस्थिती ‘जैसे थे’
Just Now!
X