तथागत बुद्धांनी सांगितलेले पंचशील कोणा एका समूह, जात अथवा धर्मासाठी नव्हे, तर सबंध मानवी समूहास कल्याणकारी आहे. याचे अनुसरण केले तर घर, समाज व देशात नक्कीच स्थर्य, शांतता नांदेल. जगभरात सध्या मानवी हक्कासाठी चर्चा सुरू आहेत. परंतु हा विचार अडीच हजार वर्षांपूर्वी तथागतांनी पहिल्यांदा मांडला. आजही तो लागू पडत असल्याचे प्रतिपादन श्रीलंका येथील धम्मदेसनेसाठी आलेले भदन्त शिवली महाथेरो यांनी केले.

Elon musk on israel iran war
इस्रायल-इराण युद्धावर एलॉन मस्क यांची लक्षवेधी प्रतिक्रिया; म्हणाले, “रॉकेट एकमेकांच्या…”
A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
Hamas Israel conflict
१३००० बालकांसह ३४५०० नागरिक मृत्यू,लाखो बेघर, संपूर्ण प्रदेश बेचिराख; गाझा युद्धाचे रक्तलांच्छित सहा महिने!
Katchatheevu island controversy
विश्लेषण: कच्चथीवू बेटावर ‘या’ हिंदू राजांनी केले होते राज्य? त्यांचा रामाशी नेमका संबंध काय होता?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून बहुजन हिताय संघाच्या वतीने धम्मदेसना, तथागत बुद्ध आणि डॉ. आंबेडकर यांच्या पवित्र अस्थींना अभिवादनाचा कार्यक्रम येथे आयोजित केला होता. प्रा. भदन्त सुमेधबोधी महाथेरो, जि. प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, गटविकास अधिकारी विलास खिल्लारे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष कैलास िशदे यांची उपस्थिती होती. जन्माने कोणीही उच्च वा नीच नसतो. तो त्याच्या विचार-कार्याने स्वतचा दर्जा निर्माण करीत असतो. सुंदर वस्त्र, अलंकार, आभुषणे घालून व्यक्तीला ज्ञानी होता येत नाही. त्यासाठी योग्य शिक्षण, त्याच्यावर जाणीवपूर्वक झालेले चांगले संस्कार महत्त्वाचे असतात. हे संस्कार कशा पद्धतीने करावेत, हे तथागत बुद्धांनी अनेक छोटय़ा-मोठय़ा प्रसंगातून सहजसोप्या शब्दांत समजावून सांगितले, असे भदन्त शिवली यांनी सांगितले.

या देशावर ७०० वष्रे परकियांनी राज्य केले. त्यामुळे बुद्ध धम्माचे मोठे नुकसान या कालावधीत झाले. त्यानंतर प्रज्ञासूर्य विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीयांना पुन्हा एकदा नव्याने धम्माची ओळख करून दिली आणि या सधम्माला ऊर्जतिावस्था मिळवून दिली. डॉ. आंबेडकरांचे काम हे केवळ दलित अथवा विशिष्ट धर्मापुरते आहे, असे मानणे चुकीचे आहे. मानवजातीच्या कल्याणासाठी जे-जे आवश्यक, ते सारे बाबासाहेबांनी आयुष्यभर केले. त्यांचे कार्य त्याच नेटाने पुढे घेऊन जाणे हे आपल्या सर्वासमोरील मोठे आव्हान असल्याचे सांगितले.

शहरातील स्मृती बुद्धविहार येथून बाबासाहेब आणि तथागतांच्या पवित्र अस्थींची अभिवादन रॅली काढण्यात आली. आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल डॉ. सुधीर िशदे, राम मस्के, शेषेराव कांबळे, मनीषा सुधीरे यांना धम्मभूषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.