औरंगाबाद येथे कार अपघातात दोघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी आहे. शहरातील रामनगर येथे पहाटेच्या वेळी हा अपघात झाला असून मृत आणि जखमी तिघेही डॉक्टर होते. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने स्विफ्ट कार झाडाला धडकली. त्यात दोन जण ठार झाले तर तिसरे डॉक्टर गंभीर जखमी झाले.

गोविंदकुमार सतनामसिंग (वय २५, रा. मूळ हरियाणा), लक्ष्मीकांत दगडीया (वय २५, रा. रामनगर) अशी मृत डॉक्टरची नावे आहेत. तर कारमधील अरविंद पवार (रा. म्हाडा कॉलनी, औरंगाबाद) हे डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर मुकुंदवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.