News Flash

केंद्रीय उत्पादन शुल्कात नोटबंदीनंतर वाढ

‘ऑल इज वेल’ चुकीचे असल्याचा उद्योजकांचा दावा

गेल्या वर्षीच्या तुलनेत २० कोटीने उत्पन्न वाढले; ‘ऑल इज वेलचुकीचे असल्याचा उद्योजकांचा दावा

नोटबंदीनंतर उद्योग क्षेत्रात आलेली मंदी केंद्रीय उत्पादन शुल्क विभागापर्यंत अजूनपर्यंत पोहचली नाही. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मिळालेला कर आणि या वर्षी डिसेंबरमध्ये झालेले करांचे संकलन यात तब्बल २० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. कराच्या पातळीवर ‘ऑल इज वेल’ असे चित्र अधिकारी रंगवत असले तरी उद्योजक मात्र हे चित्र खरे नसल्याचे सांगत आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरपर्यंत ८० कोटी ३९ लाख रुपयांचा कर केंद्रीय उत्पादन शुल्क विभागास मिळाला होता. त्यात या वर्षी वाढ होऊन ही रक्कम १०० कोटी २६ लाख रुपये झाली आहे. दिवाळीच्या कालावधीतील विक्री आणि उत्पादनाची ही आकडेवारी असू शकते, असे उद्योजक सांगत आहेत. औरंगाबाद शहरातून दुचाकी आणि चारचाकी गाडय़ांचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात होते. बजाज, ऑडी, स्कोडा या गाडय़ांच्या उत्पादनावर नोटबंदीचा परिणाम जाणवत असल्याची चर्चा उद्योग क्षेत्रात आहे. मात्र, कराच्या पातळीवर अजूनही परिणाम दिसून येत नसल्याचे चित्र डिसेंबर अखेरीच्या अहवालावरून स्पष्ट होत आहे. गेल्या वर्षी म्हणजे २०१५- १६ मध्ये एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत ५८९.०२ कोटी रुपये अबकारी कर सरकारच्या तिजोरीत जमा झाला होता. या वर्षी नोटबंदीनंतर त्यावर मोठा परिणाम होईल, असे वातावरण सर्वत्र होते. डिसेंबरच्या कर संकलनात हे चित्र अघिक स्पष्टपणे पुढे येईल, असे मानले जात होते.

मात्र, कर संकलनात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. नोव्हेंबरच्या ८ तारखेपूर्वी उद्योग क्षेत्रात काहीशी तेजी निर्माण झाली होती. विशेषत: ऑटोक्षेत्रातही खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढले होते. दिवाळीमध्ये गाडय़ांच्या नोंदणीतूनही हे जाणवले. मात्र नोटबंदीनंतर घसरण झाली. नोव्हेंबरमधील ती खरेदी-विक्री कदाचित डिसेंबरच्या कर संकलन अहवालात दिसत असेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र चेबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राम भोगले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले,‘नोटबंदीच्या निर्णयाचे परिणाम लगेच दिसणार नाहीत. हा निर्णय चांगला की वाईट हे ठरविण्यासाठी मार्च अखेरीच्या कर संकलनाच्या आकडेवारीचे विश्लेषण महत्त्वाचे ठरेल.

निर्णयाचा परिणाम तर आक्टोबपर्यंत दिसू शकेल. सध्या जरी कर संकलन अधिक दिसत असले तरी जानेवारीनंतर त्यात कदाचित ३५ टक्क्यांपर्यंतची घसरणही दिसू शकेल. मात्र, त्यावर लगेच प्रतिक्रिया व्यक्त करणे जरा घाईचे होईल.’

अबकारी करात वाढ झाली असली तरी सेवा करातून मिळणारे सरकारचे उत्पन्न मात्र घटल्याची आकडेवारी आहे. गेल्या वर्षी सेवा करातून डिसेंबर अखेपर्यंत ७३ कोटी ६७ लाख रुपये मिळाले होते. या वर्षी त्यात १० कोटीची घट दिसून येत आहे. या वर्षी डिसेंबरअखेर केवळ ६३ कोटी रुपयांचा सेवा कर तिजोरीत जमा झाला आहे.

  • डिसेंबर २०१५ पर्यंत मिळालेला अबकारी कर ८० कोटी ३९ लाख
  • डिसेंबर २०१६ अखेर मिळालेला अबकारी कर १०० कोटी २६ लाख
  • एप्रिल २०१५ ते डिसेंबर २०१५ मिळालेला कर ५८९.०२ कोटी
  • जानेवारी २०१६ ते डिसेंबर २०१६ मिळालेला कर ७७३.४७ कोटी
  • एकूण टक्केवारीतील वाढ ३१.३१

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2017 12:10 am

Web Title: central excise increase
Next Stories
1 अंतर्गत बंडाळीमुळे सर्वच पक्ष त्रस्त
2 अमित देशमुखांच्या फलकासाठी कर्मचाऱ्याला ५० हजारांची उचल
3 ११ कारखाने आणि दोन हजार दोनशे एकर जमीन कोणी विकत घेईना!
Just Now!
X