News Flash

१० हजार किलोमीटरचे रस्ते पूर्ण करणार

सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकात पाटील यांचा दावा

चंद्रकांत पाटील (संग्रहित छायाचित्र)

सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकात पाटील यांचा दावा

राज्यात १० हजार किलोमीटरचे रस्ते साईड पट्टय़ांसह पूर्ण केले जातील. त्यासाठी प्रति किलोमीटर ३ कोटी रुपयांची तरतूद करण्याचा विचार सुरू असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ६० हजार किलोमीटरपैकी १६ हजार किलोमीटर रस्ते आता राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग केले असल्याने उर्वरित रस्त्यांसाठी खूप मोठय़ा प्रमाणात निधी मिळेल. येत्या तीन वर्षांत रस्त्यांचा प्रश्नच राहणार नाही, अशी परिस्थिती निर्माण करू, असा दावा पाटील यांनी केला.

राज्यातील काही रस्ते सेंट्रल रोल फंड व नाबार्डअंतर्गत निधीतून होणार असल्याने अर्थसंकल्पातून रस्त्यांसाठी मिळणारा निधी अधिक असेल, असा दावा करताना पाटील म्हणाले, की साईड पट्टय़ा नसल्याने रोड तुटून खराब होतो. त्यामुळे येत्या काळात १० हजार किलोमीटरचे रस्ते पूर्ण केले जाणार आहेत.

औरंगाबाद मंत्रिमंडळ बैठकी दरम्यान दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली जात आहेत. डिसेंबरमध्ये मान्यता दिलेल्या २ हजार ४०० कोटी रुपयांपैकी ३०० कोटी रुपये ७०० किलोमीटरसाठी देण्यात आले आहेत. मात्र, या तरतुदीपेक्षाही अधिक रक्कम मिळणार असल्याचा दावा त्यांनी या वेळी केला. सरस्वती नदीवरील पुल वाहून जाण्याच्या घटनेनंतर धोकादायक पुलांचे फक्त सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. येत्या अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूद केली जाईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी त्याचाच आढावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठवाडय़ातील बहुतांश आमदारांनी वित्तमंत्र्यांसमोर बुधवारी रस्त्यांसाठी अधिक निधी देण्याची मागणी केली होती. ही मोठी समस्या असल्याचे वित्तमंत्र्यांनीही मान्य केले होते. मराठवाडय़ातील रस्ते तुलनेने अधिक खराब असल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनीही मान्य केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2017 1:13 am

Web Title: chandrakant patil public works minister
Next Stories
1 औरंगाबादेत विवाहाचा ‘रावसाहेबी’ थाट!
2 आर्थिक चिंता, पण महाराष्ट्राची प्रगती युरोपच्या दिशेने!
3 निमित्त विवाहाचे, दिवस ‘जोर-बैठकां’चा!
Just Now!
X