12 December 2017

News Flash

सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांचे शक्तीप्रदर्शन

गुन्ह्याच्या निषेधार्थ समर्थकांची सरकारविरोधात घोषणाबाजी

औरंगाबाद | Updated: June 19, 2017 2:52 PM

आमदार अब्दुल सत्तार यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्हाच्या निषेधार्थ सोमवारी सिल्लोड शहर काँग्रेसकडून शहर बंदची हाक देत मूक मोर्चा काढण्यात आला. ‘भांडण सोडवण्यासाठी गेलेल्यावर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या सरकारचा निषेध’ फलक घेऊन आमदार सत्तार समर्थक मोर्चात सहभागी झाले होते. शहरभरातून रॅली काढल्यानंतर मूक मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. शेतकरी मारहाण प्रकरणी आमदार अब्दुल सत्तार यांना अटक करा, या मागणीसाठी शिवसेनेकडून काही दिवसांपूर्वी सिल्लोड इथे ‘रास्तारोको’ करण्यात आला होता. शेकऱ्याला मारहाण आणि शिवीगाळप्रकरणी सत्तार यांच्यावर सिल्लोड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी शिवसेनेने केली होती. त्यानंतर आज सत्तार समर्थक रस्त्यावर उतरले.

काय आहे प्रकरण ?
सिल्लोड येथील शेतकरी मुक्तार सत्तार यांना आमदार अब्दुल सत्तार यांनी शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यांनतर सत्तार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. या प्रकरणात शेतकऱ्याला शिवीगाळ करताना हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या प्रकरणी बजरंग दलाच्या तक्रारीवरूनही सत्तार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्या शेतकऱ्याला मारहाण झाली. त्याने सत्तार माझी जमीन बळकावण्याच्या प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता.

अब्दुल सत्तार यांचा खुलासा
दलित समाजातील सखाराम कल्याणकर यांची ही जमीन आहे. तक्रारदार त्यांना परत देण्यासाठी तयार नाही. ज्या दिवशी घटना घडली. त्या दिवशी त्या जमिनीलगत असलेल्या आमच्या जमिनीत पेरणी सुरु होती. तेव्हा वाद सुरु झाला. त्यामुळे मी पोलिसांना बोलवून या भांडणात पडलो. कल्याणकर यांना मारहाण सुरु झाली होती. मी मध्यस्ती केली नसती तर त्यांचा जीव गेला असता. यावेळी मी शिव्या देऊन त्यांना हुसकावून लावले. जमीन बळकवण्याचा माझ्यावर जो आरोप करण्यात आला आहे. तो निराधार आहे, असे स्पष्टीकरण सत्तार यांनी दिले होते.

First Published on June 19, 2017 2:50 pm

Web Title: congress leader abdul sattar showing her power bjp government in aurnagabad