News Flash

औरंगाबादेत ठेकेदाराचा खून

आरोपीला तत्काळ पकडून उस्मानपुरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

(संग्रहित छायाचित्र)

औरंगाबाद : शेजाऱ्यांमध्ये झालेले भांडण खुनाच्या घटनेपर्यंत जाऊन पोहोचले. नशेत एका २५ वर्षीय तरुणाने ३४ वर्षीय कंत्राटदाराचा कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृण खून केला. ही घटना बुधवारी रात्री ११.३० च्या सुमारास शहानूरमियाँ दर्गा परिसरात घडली. शेख सुभान शेख अमीर असे मृताचे, तर शेख नईम उर्फ गोरू शेख सलीम असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला तत्काळ पकडून उस्मानपुरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

बांधकाम ठेकेदार शेख सुभान यांचा मुलगा आसेफ याची शहानुरमियां दर्गाजवळ चहाची टपरी आहे. बुधवारी रात्री सुभान हे रमजानी हॉटेल येथे मित्र अब्दुल सत्तार याच्यासोबत चहा घेत होते. त्याचवेळी शेख नईम, शेख अलीम शेख सलीम उर्फ बच्चू, शेख समीर शेख सलीम हे तिघे भाऊ हॉटेलमध्ये आले. यावेळी गोरुने सुभान यांच्या डोक्यात पाठीमागून येत कुऱ्हाडीचे दोन घाव घातले. यावेळी सुभान यांच्यासोबत चहा घेत असलेल्या दोघांवरदेखील हल्ला चढविण्यासाठी गोरु त्यांच्या पाठीमागे धावत गेला. रक्तबंबाळ झालेले सुभान जमिनीवर कोळसून बेशुद्ध झाल्यावर परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांनी तात्काळ सुभान यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, रात्री दोनच्या सुमारास त्यांना डॉक्टरांनी उपचारादरम्यान मृत घोषित केले. सुभान यांचे भाऊ शेख शकील यांच्या तक्रारीवरुन उस्मानपुरा पोलीस ठाण्यात शेख नईम, शेख अलीम, शेख समीर व त्यांच्या आईविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2019 6:51 am

Web Title: contractor murdered in aurangabad zws 70
Next Stories
1 औरंगाबादमध्ये तरुणाचा भोसकून खून
2 हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान, पण टंचाईपासून दिलासा
3 औरंगाबाद : भावाला शिवी दिल्याच्या वादातून दारुच्या नशेत खून, पाच अटकेत
Just Now!
X