07 July 2020

News Flash

करोनामुळे औरंगाबादमध्ये १३१ जणांचा मृत्यू

करोनाबाधितांची संख्या दोन हजार ५२४ एवढी झाली आहे

प्रतिनिधिक छायाचित्र

औरंगाबादमध्ये टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढू  लागली आहे. शुक्रवारी दिवसभरात करोनाबाधितांची संख्या ९४ ने वाढली. त्यामुळे आतापर्यंतच्या करोनाबाधितांची संख्या दोन हजार ५२४ एवढी झाली आहे. आतापर्यंत १३१ जणांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबाद शहरातील मदनी चौकातील ६५ वर्षांचा पुरुष, फाजलपुरा भागातील ५२ वर्षांचा व्यक्ती तर मिलकॉनर्र भागातील तीन जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (घाटी) डॉ. अरविंद गायकवाड यांनी कळविले आहे. त्यातील एका रुग्णास पूर्वीपासून हृदयविकाराचा त्रास होता. दरम्यान घाटी रुग्णालयातील मृत रुग्णसंख्या आता १०१ वर गेली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2020 1:55 am

Web Title: corona death 131 in aurangabad abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 मराठवाडय़ातून पुणे वापसी!
2 औरंगाबादमधील भाऊ-बहीण दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; दोन नातेवाईकांना अटक
3 औरंगाबादमध्ये बहिण-भावाची हत्या, दीड किलो सोनं लंपास
Just Now!
X